Assembly Elections 2024: पोलीसाला ‘चमकोगिरी’ भोवली! टपाली मतदानाचा फोटो गावाकडे पाठवला, गुन्हा दाखल

73
Assembly Elections 2024: पोलीसाला ‘चमकोगिरी’ भोवली! टपाली मतदानाचा फोटो गावाकडे पाठवला, गुन्हा दाखल
Assembly Elections 2024: पोलीसाला ‘चमकोगिरी’ भोवली! टपाली मतदानाचा फोटो गावाकडे पाठवला, गुन्हा दाखल

राज्यात विधानसभेच्या (Assembly Elections 2024) निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी टपाली मतपत्रिकेला (Postal vote) सुरूवात झाली आहे. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आता पोलीस (Police) शिपाईवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे (Police constable Ganesh Ashok Shinde) यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केलं होते. (Assembly Elections 2024)

(हेही वाचा – ‘मतांच्या धर्मयुद्धातून करावा लागेल वोट-जिहादाचा मुकाबला’ – Devendra Fadnavis यांचा मविआवर हल्लाबोल)

मत नोंदवल्यानंतर नोंदवल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली. तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

(हेही वाचा – Mumbai Local Train: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शनिवार – रविवार 12 तासांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा)

निवडणूक आयोगाने (Election Commission) ठरवून दिलेल्या नियमानुसार, सर्व मतदारांना मतदान केंद्रावर फोन वापरण्यास पुर्णपणे बंदी आहे. तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद करून केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.