शरद पवारांच्या निवृत्तीवर Ajit Pawar काय म्हणाले?

69
शरद पवारांच्या निवृत्तीवर Ajit Pawar काय म्हणाले?
शरद पवारांच्या निवृत्तीवर Ajit Pawar काय म्हणाले?

यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे ती बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघाची. अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) असा काका-पुतण्यांमध्ये सामना होणार आहे. बारामतीत प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) याचाच उल्लेख करत थेट शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं आहे. मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांच्या एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका. असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

…नाहीतर तुमची जंमतच होईल

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “तालुक्याच्या पुढाऱ्यांवरची नाराजी माझ्यावर काढू नका. भावनिक होऊ नका. आता कुणीतरी मला म्हटलं की त्यांनी फक्त शरद पवारांचा भलामोठा फोटो लावला आहे आणि त्यांचं चिन्ह लावलं आहे. ही निवडणूक शरद पवारांची आहे का? निवडणूक शरद पवारांची नाहीये. लोकसभेला तुम्ही थोडीशी गंमत केली. पण मी आता ते सगळं काढत नाही. आता मात्र विधानसभेला ती गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमतच होईल. मी खोटं सांगत नाही.”

बारामतीकरांना पुढे वाली उरणार नाही
“तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी सांगितलं आहे की दीड वर्षांनी ते पुन्हा उभे राहणार नाहीत, निवडणूक लढवणार नाही, खासदारही होणार नाहीत. त्यानंतर कोण बघणार आहे? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा.” (Ajit Pawar)

“आपल्याला अजून सुपा परगणा आणि बाकीच्या भागात करायची आहे. माझ्या कारकि‍र्दीत पाण्याच्या बाबतीत माझ्या भागाला मी स्वयंपूर्ण केलं आहे, हे मला कृतीतून दाखवायचं आहे. शरद पवारांनीही २४ वर्षांत पाझर तलाव वगैरे गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून आपला प्रश्न निकाली निघालेला नाही.” असंही अजित पवारांनी म्हटले आहे. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.