-
ऋजुता लुकतुके
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना १३५ धावांनी जिंकून मालिका ३-१ ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्याकडून नाबाद शतकी खेळी पाहायला मिळाली, भारताने २० षटकात १ गडी गमावून २८३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १८.२ षटकांत १४८ धावांवरच सर्वबाद झाला. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने भारतीय संघाकडून सर्वाधिक ३ बळी मिळवले. (Ind vs SA, 4th T20)
(हेही वाचा- Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा)
मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधाराने संघातील दोन युवा खेळाडूंच्या हातात सर्वप्रथम चषक येईल असं पाहिलं. त्यातून महेंद्रसिंग धोनीने सुरू केलेली परंपरा सुरू ठेवली. माहीने हा ट्रेंड बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच्या कर्णधारपदाखाली सुरू केला होता, जो विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यानंतर आता सूर्यकुमार यादवही पुढे नेताना दिसत आहे. (Ind vs SA, 4th T20)
दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकल्यानंतर सूर्याने रमणदीप सिंग आणि विजयकुमार व्यक्ष यांच्याकडे चषक दिला. रमणदीपला मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळण्याची संधी मिळाली, मात्र विजयकुमारला या मालिकेत पदार्पण करता आले नाही. भारतीय संघाने मालिका विजयानंतर जल्लोषात आनंद साजरा केला. (Ind vs SA, 4th T20)
#TeamIndia seal series victory in style yet again! 🏆🇮🇳#SAvIND #JioCinema #Sports18 #ColorsCineplex #JioCinemaSports pic.twitter.com/rvablJshgs
— JioCinema (@JioCinema) November 15, 2024
एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत अत्यंत खराब कामगिरी राहिली, ज्यामुळे भारतीय संघाने २८३ धावांपर्यंत धावसंख्या गाठली. परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ केवळ १४८ धावा करू शकला, त्याची सुरुवात खूपच खराब झाली. आफ्रिकेने पहिले चार गडी केवळ १० धावांवर गमावले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी त्यांना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी टी-२० आंतरराष्ट्रीय मधील धावांच्या फरकाच्या बाबतीत भारताचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. (Ind vs SA, 4th T20)
(हेही वाचा- Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?)
या टी-२० मालिकेत टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा फलंदाजीत चमकदार असताना वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत आपला प्रभाव दाखवण्यात यशस्वी ठरला. या मालिकेत तिलकांच्या बॅटने चार डावात १४० च्या सरासरीने २८० धावा केल्या, तर संजूनेही या मालिकेत ७२ च्या सरासरीने २१६ धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने चार सामन्यांत ११.५० च्या सरासरीने एकूण १२ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंगलाही ८ बळी मिळवण्यात यश आले. (Ind vs SA, 4th T20)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community