भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात

35
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात

भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ने (SriLankan Airlines) अनोखी शक्कल लढवली आहे. ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ने रामकथेवर आधारित एका जाहिरातीची निर्मिती करत भारतीयांचे लक्ष वेधले आहे. ज्यामुळे ही जाहीरात म्हणजे भारत-श्रीलंकेतील रामायणाचा एक अस्सल दस्ताऐवज असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : Voting boycott : मुंबईतील ‘या’ भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार; हे आहे कारण

जाहिरातीतील माहिती आणि रचनेमुळे केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या मनात एकदातरी श्रीलंकेला भेट देण्याची आणि इतिहासाची ही दुर्मीळ पाने उलटण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर या जाहिरातीला कोटीच्या घरात हिट्स, लाईक मिळाले आहेत. या जाहिरातीत, एक भारतीय आजी आपल्या नातवाला एका कथेच्या पुस्तकातील रामायणाबद्दल (Ramayana) सांगत आहे. ती सांगते की, आजही रामायणात (Ramayana) सांगितलेली ठिकाणे श्रीलंकेत अस्तित्वात आहेत. दैत्य राजा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेला कुठे नेले होते, हेही ती सांगते. (SriLankan Airlines)

त्यानंतर रामायण (Ramayana) कथा अ‍ॅनिमेशनच्या मदतीने पुढे सरकते. ज्यात निसर्गरम्य सहलीमध्ये इलाजवळील रावणाची गुहादेखील आहे. रावणाने सीतेला अशोक वाटिकेत नेण्यापूर्वी तिथे नेले होते. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सीता अम्मान मंदिर (Seetha Amman Kovil) दाखवले आहे. त्यानंतर आजी सांगते की, भगवान रामाच्या माकड आणि अस्वलांच्या सैन्याने भारताला लंकेशी जोडणारा, रामेश्वरम्पासून श्रीलंकेच्या (Sri Lanka) समुद्रापर्यंत असलेला रामसेतू आजही पाहायला मिळतो, असे जाहिरातीत दाखवले आहे. (SriLankan Airlines)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.