रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?

51
रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?
रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी कटिबद्धतेचा इशारा दिला आहे. ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या एका कार्यक्रमात बोलताना, ट्रम्प यांनी युद्धातील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल दुःख व्यक्त करत युद्ध थांबवण्यासोबतच पश्चिम आशियात (West Asia) शांतता प्रस्थापित करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.

(हेही वाचा-Chhattisgarh मध्ये सुरक्षा दलांनी केला ५ माओवाद्यांचा खात्मा; दोन जवान जखमी)

ट्रम्प म्हणाले की (Donald Trump) , आम्ही रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) स्थितीवर गंभीरपणे विचार करत आहोत. हे युद्ध थांबवायला हवे, कारण यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या भाषणामध्ये त्यांनी इतर देशांद्वारे युक्रेनवर बेकायदेशीर आक्रमण रोखण्याची आवश्यकता व्यक्त केली. अमेरिकेतील ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांचे हे पहिले सार्वजनिक भाषण होते. त्यात त्यांनी पश्चिम आशिया आणि रशिया-युक्रेन युद्धाला थांबवण्यासाठी आपल्या प्रशासनाच्या प्रयत्नांची कल्पनाही मांडली.

(हेही वाचा-Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू)

कार्यक्रमात ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क आणि भारतीय-अमेरिकी उद्योजक विवेक रामस्वामी यांची देखील प्रशंसा केली. ट्रम्प यांच्या भाषणामुळे युद्ध थांबविण्याच्या संभाव्य धोरणांवर चर्चा सुरू होईल, असे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतीत असलेली अनुकूल भूमिका लक्षात घेता, युक्रेनमधील संघर्ष थांबविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.