उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात एका मदरसामध्ये (Madrasa) मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्काराचा विरोध केल्यावर पीडितेला निकाह करण्याचे आश्वासन देऊन गप्प बसवण्यात आले. याप्रकरणी बिलाल अहमद (Bilal Ahmed) हा आरोप आहे. पोलिसांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र गुन्हा दाखल होताच बिलाल अहमद फरार झाला आहे.
( हेही वाचा : Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू)
हे प्रकरण कौशांबीच्या महेवाघाट ठाणे परिसरातील आहे. इथे दि. १३ नोव्हेंबर रोजी २६ वर्षीय पीडित मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, माझ्या गावात राहणारा जफर अमहदचा मुलगा बिलाल अहमद (Bilal Ahmed) गेल्या एक महिन्यापासून माझ्यावर बलात्कार करत आहे. बिलाल ने पीडितेला निकाह करण्याचे वचन ही दिले. दि. १ नोव्हेंबरला बिलालने पीडितेला गावातील एका मदरसामध्ये (Madrasa) बोलवले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.
एका वृत्तसंस्थांने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पीडितेला गर्भवती झाल्याचे कळले. तेव्हा पीडितेने बिलालवर (Bilal Ahmed) निकाह करण्यास दबाव टाकला. मात्र बिलाल अहमदने निकाह करण्यास नकरा देत, पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी हतबल होत पीडितेने पोलिसांना तक्रार देत, आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. आरोपी बिलाल अहमद (Bilal Ahmed) विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८१ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरार आरोपी बिलाल अहमद याला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास पथकाची स्थापना केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community