Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…

60
Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०...
  • खास प्रतिनिधी 

राज्यातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी तब्बल ४२० उमेदवार हे मुस्लिम (Muslim) समाजाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यावेळी निवडणुकीत एकूण ४१३६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात ४२० मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. भाजपा वगळता सर्वच पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारांना तिकीट दिले आहे. महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुस्लिमांना तिकीट दिले असून काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांवर विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’पासून ते समाजवादी पक्षापर्यंत सगळ्यांनी मुस्लिम (Muslim) उमेदवार उभे केले आहेत.

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये सुरक्षा दलांनी केला ५ माओवाद्यांचा खात्मा; दोन जवान जखमी)

१२ टक्के मुस्लिम मतदार

महाराष्ट्रात १२ टक्के मुस्लिम (Muslim) मतदार आहेत आणि त्यांचा प्रभाव पाच जागांवर अधिक आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात सुमारे ६० टक्के मुस्लिम मतदार आहेत, तर राज्यातील अन्य ९ जागांवर ४० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत, तर १५ जागांवर ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत आणि ३८ जागांवर २० टक्के मुस्लिम मतदार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती मुस्लिम उमेदवार?

राज्यातील २८८ जागांपैकी २१८ मुस्लिम उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावत आहेत तर २०२ मुस्लिम उमेदवार विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने १४ मुस्लिम उमेदवार उभे केले असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सात मुस्लिम (Muslim) उमेदवारांना तिकीट दिले आहे.

(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीने खरंच वय चोरलं?)

शरद पवारांकडून चार मुस्लिम

महाविकास आघाडीतील १४ पैकी काँग्रेसने ९ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना उबाठाने केवळ एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे. मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून हारुन खान हे उबाठाचे उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चार मुस्लिमांना (Muslim) तिकीट दिले आहे त्यात मुंबईत एक, विदर्भात दोन आणि मराठवाड्यात एका मुस्लिमाला उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाकडून एकही नाही

भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नसले तरी त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने एक मुस्लिम उमेदवार सिल्लोडमधून अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना तिकीट दिले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच मुस्लिम उमेदवार उभे करण्यात आले असून त्यात मुंब्रा मतदारसंघातून नझिमुल्ला, मानखुर्द नगरमधून नवाब मलिक, अणुशक्ती नगरमधून सना मलिक, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आणि कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा – भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात)

एमआयएम-सपाचे मुस्लिम कार्ड

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमने राज्यात १६ जागांवर निवडणूक लढवत आहे, ज्यामध्ये १२ जागांवर मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. ओवेसींप्रमाणेच सपानेही आठ जागांवर निवडणूक लढवत असून त्यापैकी सहा जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील २१८ जागांवर अपक्ष मुस्लिम उमेदवार नशीब आजमावत आहेत तर राज्यातील मुस्लिमबहुल मालेगावमध्ये १३ मुस्लिम उमेदवार आहेत. राज्यातील संभाजीनगर पूर्व जागेवर १७ मुस्लिम (Muslim) उमेदवार आहेत. येथे तीन मुस्लिम महिलाही निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात यावेळी एकूण २२ मुस्लिम महिला निवडणूक लढवत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.