राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्या असून, येत्या १८ नोव्हेंबर रोजी प्रचारांच्या तोफा थंडावतील. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण (Rajya Sabha MP Ashok Chavan) यांच्या काँग्रेस सोडून भाजपामधील प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण (Srijaya Chavan) यांच्या प्रचारार्थ सभेत जनतेला संबोधित करत होते. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू)
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले (CM Eknath Shinde) की, “काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आल्याने या जिल्ह्याची आणि महायुतीची ताकद वाढली आहे. काँग्रेसने (Congress) बाबासाहेबांना खूप त्रास दिला. बाबासाहेब म्हणाले होते, ‘काँग्रेस हे जळक घर आहे, यापासून दूर रहा’. हे बरोबर अशोक चव्हाण यांनी ते ऐकले.” यावेळी, “जोवर सूर्य आणि चंद्र असेल, तोवर बाबासाहेबांचे संविधान (Constitution) कायम राहील,” असेही शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community