- खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची दोन पानी जाहिरात (Advertisement) वृत्तपत्रात प्रसिद्ध केली, त्यातही महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देऊन ठाकरे यांना त्यांची जागा दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पहिल्या पानावर ‘पंजा’ पहिल्या स्थानी
१६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांनी एक जाहिरात (Advertisement) प्रसिद्ध करून महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र या जाहिरातीत तीनही पक्षांचे निवडणूक चिन्ह क्रम पाहता पहिल्या पानावर काँग्रेसचा पंजा पहिल्या स्थानी असून दुसऱ्या स्थानी राष्ट्रवादी (शप) गटाची तुतारी आणि तिसऱ्या क्रमांकावर उबाठाच्या ‘मशाल’ला स्थान देण्यात आले आहे.
(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?)
दुसऱ्या पानावर ‘तुतारी’ पहिले
तर दुसऱ्या पानावरील जाहिरातीतही (Advertisement) राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाची तुतारी पहिल्या स्थानी, त्यानंतर काँग्रेसचा पंजा आणि शेवटी ठाकरेंची मशाल, असा क्रम लावण्यात आल्याने काहीही केले तरी उबाठा महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे जाहिरातीतूनही सूचित करण्यात आले आहे.
वारंवार अपमान
शिवसेना उबाठाचा अन्य दोन पक्षांकडून अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वारंवार अपमान होऊनही उबाठा मूग गिळून गप्प आहे. याआधीही शिवसेना उबाठाने अनेक प्रयत्न करून, दबाव टाकूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) गटाने उबाठाची मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा चेहेरा घोषित करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली. उद्धव ठाकरे यांनी यासाठी दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना घरचा रस्ता दाखवला.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स करंडक नेण्याला आयसीसीची अखेर मनाई)
शिवसैनिकांमध्ये नाराजी
अशाप्रकारे वेळोवेळी अपमान होत असूनही पर्याय नसल्याने उबाठा महाविकास आघाडीला चिकटून बसल्याने जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community