Assembly Elections : ‘मुंबईकर व्होटकर’ अशाप्रकारे घोषणा देत पश्चिम उपनगरांत बाईक रॅलीद्वारे जनजागृती

61
Assembly Elections : ‘मुंबईकर व्होटकर’ अशाप्रकारे घोषणा देत पश्चिम उपनगरांत बाईक रॅलीद्वारे जनजागृती
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी शनिवारी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून दिंडोशी, मालाड पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पूर्व, आणि अंधेरी पश्चिम या मतदारसंघात मतदान जनजागृती करण्यात आली. महानगरपालिकेचे सहआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या सूचनेनुसार या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Assembly Elections) मध्ये मतदानाचे प्रमाण अधिक वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम येथील पी उत्तर विभाग कार्यालय येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध परिसरातून मतदान जनजागृतीपर घोषणा देत मोटर सायकल रॅली निघाली. ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा’, ‘माझे मत माझा अधिकार’, ‘चला मतदान करूया, आपला विकास करूया’, ‘१८ वर्षे केले पार, चला वापरूया मतदानाचा अधिकार’, ‘मुंबईकर व्होट कर’ अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.

(हेही वाचा – Madrasa मध्ये बिलाल अहमदचा तरुणीवर बलात्कार, पीडितेला दिली जीवे मारण्याची धमकी)

मालाड पश्चिम येथील पी उत्तर कार्यालय येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला. प्रारंभी मोटरसायकल रॅलीतील सहभागी सर्वांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Assembly Elections) पार्श्वभूमीवर ‘स्वीप’ उपक्रम अंतर्गत मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. स्वामी विवेकानंद मार्गे ही रॅली जुहू चौपाटी येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोहोचली. जुहू चौपाटी या ठिकाणी मतदान जनजागृतीचा संदेश देणाऱ्या सेल्फी पॉईंटसह स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

उप आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्यासाठी आणि राज्याचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा दिवस हा सुट्टी म्हणून न पाहता तो एक उत्सव म्हणून पाहावा. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून प्रत्येक नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन दिघावकर यांनी केले. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.