UBT Shiv Sena ची सभा रद्द, पण स्मृतीस्थळावर उभारले छोटे व्यासपीठ

93
UBT Shiv Sena ची सभा रद्द, पण स्मृतीस्थळावर उभारले छोटे व्यासपीठ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन असून या स्मृतीदिनी बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येत असतात. यंदा लोकसभेची निवडणूक आहे आणि प्रचारासाठी शिवाजी पार्कचे मैदान न मिळाल्याने येथे येणाऱ्या शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी स्मृतीस्थळाच्या शेजारी छोटेखानी व्यासपीठ बांधण्यात आले आहे. या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या व्यासपीठावरून शिवसेना उबाठा (UBT Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह नेते मंडळी ही शिवसैनिकांना मार्गदर्शन करून संबोधित करताना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे. आजवर याठिकाणी कधीही व्यासपीठ बांधण्यात आले नव्हते, परंतु यंदा हे व्यासपीठ उभारण्यात आल्याने शिवाजी पार्कवरील प्रचारसभेची उणीव अशाप्रकारे भरून काढण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Madrasa मध्ये बिलाल अहमदचा तरुणीवर बलात्कार, पीडितेला दिली जीवे मारण्याची धमकी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ मध्ये झाल्यानंतर पुढील वर्षांत शिवाजी पार्क येथील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले. तेव्हापासून स्मृतीस्थळावर १७ नोव्हेंबरला अर्थात बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी स्मृतीस्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी करतात. आजवर शिवतिर्थावर बाळासाहेबांवर प्रेम करणाया अनुयायांना तसेच शिवसैनिकांना उन्हात उभे राहता येऊ नये तसेच शिस्तीने सर्वांना बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करता यावे यासाठी स्मृतीस्थळ ते समर्थ व्यायाम मंदिरापर्यंत मैदानाच्या आतील बाजूस बांबूंचे बांधकाम करून त्यावर भगव्या रंगाचा पडदा बांधला जातो. मात्र, आजवर स्मृतीस्थळाच्या ठिकाणी सभा मंडप तथा व्यासपीठ उभारले जात नाही. परंतु यंदा प्रथमच छोटा मंडप आणि व्यासपीठ उभारण्यात आला आहे. त्यामुळे या व्यासपीठावरून उपस्थित शिवसैनिकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. (UBT Shiv Sena)

(हेही वाचा – Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…

दर्शन घ्या आणि बीकेसीत चला

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सभा घेण्यास परवानगी मिळण्याची आशा धुसर झालेली असतानाही उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते व नेते संजय राऊत यांनी १७ नोव्हेंबरला शिवतिर्थावरच सभा होणार असल्याचे शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना सांगितले. परंतु शनिवारी संजय राऊत यांनी उबाठा शिवसेनेची प्रचार सभा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्मृतीस्थळावर येणाऱ्या शिवसैनिकांना दर्शन घेऊन बीकेसी गाठावी लागणार आहे. (UBT Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.