Maharashtra Assembly Elections : ‘वारं फिरलंय’ लक्षात येताच, शरद पवार शिरले संजय राऊतांच्या भूमिकेत!

60
Maharashtra Assembly Elections : ‘वारं फिरलंय’ लक्षात येताच, शरद पवार शिरले संजय राऊतांच्या भूमिकेत!
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्या दररोज होणाऱ्या सकाळच्या पत्रकार परिषदेची सर्वसामान्य जनताही ‘सकाळचा भोंगा’ म्हणून खिल्ली उडवू लागल्याने राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. हे लक्षात आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मैदानात उतरून सकाळच्या पत्रकार परिषदेला सामोरे जावे लागले. याचा अर्थ ‘वारं फिरलंय’. महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण बदलत चालले असून महायुतीच्या बाजूने जनमत तयार होत असल्याने खुद्द पवार राऊतांच्या भूमिकेत शिरून भाजपावर टीका करू लागले आहेत. (Maharashtra Assembly Elections)

पुन्हा ‘फेक नरेटीव्ह’

१६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी ‘४०० पार’चा नारा दिला. हे ४०० पार कशाला हवे होते, तर त्यांच्याच एका सहकार्याने सांगितले की, घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी ४०० पार ची गरज आहे. हे आम्हाला लोकांना सांगावे लागले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही लोकांसमोर मांडत आहोत आणि मांडणार आहोत.” ‘मविआ’ने लोकसभा निवडणुकीत जे ‘फेक नरेटीव्ह’ पेरले तसाच प्रयत्न पवार यांनी पुन्हा सुरू केल्याचे दिसते आहे. (Maharashtra Assembly Elections)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : फडणवीसही आता म्हणून लागले, लाव रे तो व्हिडीओ!)

‘वोट जिहाद’वरही घसरले

फडणवीस यांनी ‘वोट जिहाद’ चा आरोप केला आहे, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “जिहादचा विषय फडणवीस यांनी काढला, इतर कोणी काढला नाही. लोकसभा निवडणुकीत काही मतदार संघात अल्पसंख्यांक समाजाने महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान केले. एखाद्या मतदार संघात एखादा विशिष्ठ समाज जास्त संखेने असेल, उदाहरणार्थ पुण्याच्या काही भागात एक विशिष्ट समाज आहे, हिंदू समाजामध्ये, त्यांनी भाजपाला मतदान केले तर त्यांचा अर्थ आम्ही काही जिहाद समजत नाही, तर तिथल्या लोकांची विधारधारा आहे. आणि ‘वोट जिहाद’ हा शब्द वापरुन फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते,” असे पवार म्हणाले. (Maharashtra Assembly Elections)

फडणवीस टार्गेट

तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपाच्या घोषणेवरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपाला या निवडणुकीत यश मिळत नाही, हे दिसताच हिंदू-मुस्लिम यांच्यात चांगले असलेले वातावरण खराब करायचे, हा प्रयत्न या घोषणेतून दिसून येतो आहे,” अशी टीका पवार यांनी केली. अशा विषयावर संजय राऊत रोज बोलतात, मात्र ते कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे पवार यांच्या लक्षात आल्याने पवार यांनी स्वतः ‘सकाळचा भोंगा’ हातात घेतला, अशी चर्चा होत आहे. (Maharashtra Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.