त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे; Sanjay Shirsat यांची उद्धव ठाकरेंवर टीका

37
त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे; Sanjay Shirsat यांची उद्धव ठाकरेंवर टीका
त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे; Sanjay Shirsat यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मोदीजींच्या सभेतून मी आव्हान दिले होते की, उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायचे तसे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणावे. आव्हान करून देखील उद्धव साहेबांनी ते वाक्य वापरलं नाही. वाक्य वापरायचं सोडून द्या. परंतु त्या सांस्कृतिक मंडळावर जय भवानी जय शिवाजी म्हटलं जायचं. त्या ठिकाणी अल्लाह हू अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहे. या पद्धतीने आता त्यांचा पक्ष चालला आहे. ज्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लाखोंच्या सभा घेतल्या, त्या ठिकाणी अशा घोषणा देऊन जर हे भाषण करत असतील तर मला असे वाटते की, त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे. हिंदुत्वाच्या गप्पा मारणे बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा, अशी टीका शिवसेना (Shiv Sena) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?)

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महायुतीच्या नेत्यांवर करत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. संजय शिरसाट म्हणाले की, भगव्याला कलंक कोणी लावला आहे? तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी पाहिले आहे. अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. फक्त कोणावर तरी टोमणे मारायचे, दाढी म्हणायचं, माझ्या बॅगा चेक झाल्या म्हणायचं, काल मुख्यमंत्र्यांच्या देखील बॅगा संभाजीनगरच्या विमानतळावर चेक करण्यात आल्या. आम्ही इश्यू करायचा का? परंतु आमच्याच बॅगा का चेक केल्या? असे म्हणत बसायचे. निवडणूक आयोगाला त्यांचं काम करू द्यायला पाहिजे. राज्यघटनेने जे काही त्यांना अधिकार दिले आहे त्याचा वापर त्यांनी केला तर त्यात काही गैर नाही. कोणीही बॅगा विमानातून आणत नाही. जे बॅगा तुमच्याकडे येतात त्या कशा येतात? त्या मागच्या दारांनीच येतात ना. त्यामुळे चोर कधी उघड चोरी करत नाही आणि आमच्यावर टीका करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.