दर्यापूर विधानसभा (Daryapur Assembly) मतदारसंघातील खल्लार या गावात युवा स्वाभिमानचे उमेदवार अरुण बुंदीले (Arun Bundile) यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा (Navneet Rana) यांचं भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा-त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे; Sanjay Shirsat यांची उद्धव ठाकरेंवर टीका)
युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचं न ऐकता घोषणाबाजी सुरु ठेवली. तेव्हा नवनीत राणा (Navneet Rana) स्वत: त्यांना समजावण्यासाठी जात असतानाही काही लोकांनी त्यांच्या दिशेने खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एक खुर्ची नवनीत राणा यांच्या अंगरक्षकालाही लागली.
(हेही वाचा-Manipur मध्ये मंत्री, आमदारांच्या घरांवर हल्ले; जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव)
यासंदर्भात बोलताना नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, “खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. आम्ही शांततेत प्रचार करत होतो. माझं भाषण सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. माझ्या दिशेने बघून घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्या. भाषण झाल्यानंतर मी स्वत: त्यांच्याकडे समजावण्यासाठी गेली. मात्र, त्या लोकांनी माझ्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.”
(हेही वाचा-Devendra Fadnavis : फडणवीसही आता म्हणून लागले, लाव रे तो व्हिडीओ!)
मोठ्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. दोन तासानंतर हा हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलीसांनी तक्रार दाखल करून 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले. पण आरोपींना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक केली नाहीतर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू याठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community