त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली; Eknath Shinde यांनी सांगितले भाजपसोबत जाण्याचे कारण

62
त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली; Eknath Shinde यांनी सांगितले भाजपसोबत जाण्याचे कारण
त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली; Eknath Shinde यांनी सांगितले भाजपसोबत जाण्याचे कारण

शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. आम्ही शिवसेना वाचवली. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही सुडाचे राजकारण कधीच करत नाही. नारायण राणे यांना जेलमध्ये टाकत नाही. पत्रकारांना जेलमध्ये टाकत नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणांना जेलमध्ये टाकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर चार पाच जणांची नावे कारवाईसाठी होती. पण आम्ही विरोध करत सरकार पाडून टाकले आणि आपल्याला अपेक्षित सरकार आणले, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

(हेही वाचा – Navneet Rana यांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल)

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात प्रचाराचा धुरळा उठला आहे. निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे, ते म्हणजे “मला तुम्ही हलक्यात घेतलं. त्याचे परिणाम आता दिसत आहेत.” असं मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) विक्रोळीत प्रचारसभेच्या दरम्यान म्हटलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचे कारण स्पष्ट केले.

आम्ही काय फेस करणार होतो निवडणूक ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, मी त्यांना सांगत होतो. आपण शिवसेना भाजप (BJP) म्हणून लढलो आहे. आपण मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार केला आहे आणि लोकांनी त्यामुळे आपल्याला मतदान केलं आहे. पुन्हा आपण शिवसेना भाजप असं सरकार आणूया पुन्हा सगळं झालं गेलेले विसरून जाऊयात. पण मग त्या वेळेस त्यांना (ठाकरेंना) असं वाटलं असेल हा काय बोलतो आहे, याला काय महत्त्व द्यायचं, याला काय माहिती आहे आणि मग जेव्हा आम्ही तीन चार पाच वेळा बोललो आणि जेव्हा मला कळलं आता काही बदल होणार नाही. त्यानंतर काही आमदार माझ्यासोबत होते तेही आग्रही होते. त्यांना भीती होती. आम्ही काय फेस करणार होतो निवडणूक ? कशी लढवणार कोणत्या मुद्द्यावर आम्ही ती निवडणूक लढवणार आणि आम्ही मतदारसंघांमध्ये काय काम करणार, फंड मिळत नाही, तिकडे विचारधारा सोडली मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.