देश एकसंघ राखण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा; Piyush Goyal यांचा काँग्रेसवर घणाघात

39
देश एकसंघ राखण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा; Piyush Goyal यांचा काँग्रेसवर घणाघात
देश एकसंघ राखण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा; Piyush Goyal यांचा काँग्रेसवर घणाघात

धर्म, जात आणि भाषेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील जनतेत फूट घडवून आणत आहे. त्यांचा तो एकमेव कार्यक्रम असून, त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या या नीतीला उत्तर देण्यासाठी आणि देश एकसंघ राखण्याच्या हेतूनेच आम्ही ‘बटेंगे तो कटेंगे’ (Batenge to Katenge) आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा देत आहोत. लोकसभेला काँग्रेसने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता जनता सावध झाली आहे. मुंबईत आम्ही दणदणीत जागा जिंकणार आहोत. महाविनाश आघाडीचा पराभव अटळ आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Amit Shah यांच्या सर्व सभा रद्द! तातडीने दिल्लीला रवाना; कारण आलं समोर)

पीयूष गोयल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर निर्माण झालेली नाराजी, मनोज जरांगे यांचे आंदोलन या विषयांवरही भाष्य केले.

पियुष गोयल (Piyush Goyal) पुढे म्हणाले की, दलित, ओबीसी यांचे आरक्षण कापून मुस्लिमांना १० टक्के आरक्षण (muslim reservation) देण्याचे काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का तसेच बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक करण्याचे धाडस राहुल गांधी दाखवणार का ? काँग्रेस पक्ष तुटत चालला आहे. उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत. या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतील. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, अशी बाळासाहेबांची ठाम भूमिका होती. उद्धव यांना मात्र या भूमिकेचा विसर पडला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.