आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते; Surajya Abhiyan चे आवाहन

32
आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते; Surajya Abhiyan चे आवाहन
आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते; Surajya Abhiyan चे आवाहन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर या दिवशी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे; मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग, तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेल्या ‘व्होट जिहाद’ (Vote Jihad) हा चिंतेचा विषय आहे. आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा – देश एकसंघ राखण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा; Piyush Goyal यांचा काँग्रेसवर घणाघात)

राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणाऱ्याला मतदान करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी सामाजिक माध्यमांवर ‘सुराज्य अभियाना’च्या (Surajya Abhiyan) वतीने #VoteForSurajya असे आवाहन करून राज्यभरात जनतेमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, यासाठी राजकीय पक्षांसह अनेक स्वयंसेवी संघटना (Surajya Abhiyan) जागृती करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.