Strawberry Cake : स्ट्रॉबेरी केकची ही नावे तुम्ही कधी ऐकली आहेत का?

जिलेट डे फ्रायसेस हे स्ट्रॉबेरी शॉर्टकेकचं फ्रेंच नाव आहे.

19
Strawberry Cake : स्ट्रॉबेरी केकची ही नावे तुम्ही कधी ऐकली आहेत का?
Strawberry Cake : स्ट्रॉबेरी केकची ही नावे तुम्ही कधी ऐकली आहेत का?

केक हा प्रकारंच अनेकांना खूप आवडतो. काही लोक तर डेजर्टमध्ये केक खाणे पसंत करतात. त्यात स्ट्रॉबेरी केक (Strawberry Cake) हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या केकबद्दल गंमतीदार गोष्टी सांगणार आहोत. स्ट्रॉबेरी केकची वेगवेगळी नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फ्रेझियर

स्ट्रॉबेरी, पेस्ट्री क्रीम आणि बदाम स्पंज केक किंवा मेरिंग्यूने तयार केलेला हा पारंपारिक फ्रेंच स्ट्रॉबेरी केक (Strawberry Cake) असतो. हे नाव फ्रेंच शब्द फ्रायसेस वरून आलं आहे. फ्रायसेस म्हणजे स्ट्रॉबेरी होय.

(हेही वाचा – Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला!)

जिलेट डे फ्रायसेस हे स्ट्रॉबेरी शॉर्टकेकचं फ्रेंच नाव आहे.

स्ट्रॉबेरी चीजकेक

एका चीजकेकवर स्ट्रॉबेरीचा वापर टॉपिंग म्हणून केला जाऊ शकतो किंवा केकमध्येही केला जाऊ शकतो.

स्ट्रॉबेरी शॉर्टकेक

हे कुरकुरीत स्कोनसारखे पोत, त्यासोबत स्ट्रॉबेरीचं फळ आणि मलई असलेलं एक लोकप्रिय मिष्टान्न आहे.

फ्रेश स्ट्रॉबेरी कॉफी केक

ताज्या स्ट्रॉबेरी आणि नारळाच्या तुकड्याने बनवलेला ओलसर आणि हलका कॉफी केक चवीला खूप रुचकर असतो.

फ्रेझियर हा बदाम स्पंज केक किंवा मेरिंग्यू, पेस्ट्री क्रीम आणि स्ट्रॉबेरीपासून बनलेला स्ट्रॉबेरी केक (Strawberry Cake) असतो. हा केक सामान्यत: स्ट्रॉबेरीच्या हंगामातचं बनवला जातो. कारण स्ट्रॉबेरी हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. स्ट्रॉबेरीचं फ्रेंच भाषेतलं नाव असलेल्या फ्रेस या शब्दावरून फ्रेझियर हे नाव आलं आहे.

फ्रेंच एन्ट्रेमेट मिष्टान्नांमध्ये फ्रेझियर हा एक क्लासिक पदार्थ आहे. १९व्या शतकाच्या शेवटी ऑगस्ट एस्कोफियरने तयार केलेल्या केकपासून फ्रेझियर तयार करण्यात आला होता. या पदार्थामध्ये ताज्या स्ट्रॉबेरीचा समावेश असतो.

हल्ली मिळणारं फ्रेझियर हे गॅस्टन लेनोत्रे यांनी १९६६ सालीच तयार केलं होते. त्यावेळी त्यांनी स्पंज केकबरोबरच स्ट्रॉबेरी केक बनवला त्यामध्ये किर्श, बटरक्रीम आणि ताज्या स्ट्रॉबेरीचा वापर केला गेला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.