इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया (Caesarea) शहरात नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले. पण सुदैवाने हे बॉम्ब घराबाहेरील बागेत पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.
घराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना
गेल्या महिनाभराच्या काळात नेतान्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबरलाही नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या हल्ल्याची जबाबदारी इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाह संघटनेने घेतली होती. त्यावेळी नेतान्याहू यांनी, हिजबुल्लाहने त्यांची व पत्नीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.
प्रकरणाची चौकशी सुरू
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सीझेरिया शहरात नेतान्याहू यांच्या निवासस्थानाजवळ दोन बॉम्ब टाकण्यात आले. पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले की, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील बागेत दोन बॉम्ब पडले. घटनेच्या वेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.” (Benjamin Netanyahu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community