Mahim Assembly 2024 : भाजपा मनसेच्या पाठिशी, सरवणकरांचे काय होणार?

111
Mahim Assembly 2024 : भाजपा मनसेच्या पाठिशी, सरवणकरांचे काय होणार?
Mahim Assembly 2024 : भाजपा मनसेच्या पाठिशी, सरवणकरांचे काय होणार?
विशेष प्रतिनिधी,मुंबई

माहीम विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे निवडणूक रिंगणात असतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाने मात्र मनसेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाचे वातावरण आजही कायम आहे. त्यातच भाजपाचे अध्यक्ष आशिष् शेलार (Ashish Shelar) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित यांचा विजय झाल्यास मला जास्त आनंद होईल,असे मत त्यांनी मांडले आहे. शेलार यांच्या व्हिडीओमुळे माहीममधील भाजपाच्या नेत्यांसह कायकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. शेलार आणि त्यांची भाजपा मनसेच्या पाठिशी उभी राहणार असल्याने महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे काय होणार असा प्रश्न आता माहिमकरांना पडला आहे.

(हेही वाचा – Amit Shah दोन दिवस मुंबईत?)

माहीम विधानसभा (Mahim Assembly 2024) मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे निवडणूक रिंगणात उतरले असून उबाठा शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांचे त्यांना आव्हान आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सर्व प्रथम मनसेला पाठिंबा दिला होता, त्यानंतर सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी अर्ज भरल्यानंतर महायुतीच्या पाठिशी भाजपा असेल असे जाहीर सांगितले होते. त्यानंतर भाजपाचे प्रसाद लाड यांनीही मनसेला पाठिंबा जाहीर केला. त्यातच आता आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेलार यांनी, मी महायुतीबरोबर आहे आणि राहीन. प्रचार करेन, संघटना ठेवीन, पण मला आनंद हा अमित ठाकरे जिंकल्यावरच होईल,असे म्हटले आहे.

(हेही वाचा – Kirit Somaiya यांची पवारांवर टीका; म्हणाले, शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते की…)

मी माझ्या कर्तव्यात तसूभरही मागे जाणार नाही. बिल्कूल जाणार नाही. महायुतीचा शिलेदार आहे मी. आणि महायुतीचा शिलेदार म्हणून महायुतीबरोबर तन मन धन याने उभा राहतो आहे, आहे. आजही आहे पण म्हणून अमित जवळचा नाही असे कसे म्हणू. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आतापर्यंत केलेले संबंध, संपर्क, आणि व्यक्तीगत आयुष्यातील उपकार कसे विसरु. नाही आम्ही विसरणार. आणि म्हणून ही परिस्थितीच यायला नाही पाहिजे होती. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जरा विचार करावा. जेव्हा जेव्हा प्रेमाने आपुलकीने, राजकीय किंवा अशी एखादी काही मदत लागली असेल तेव्हा राज ठाकरे यांनी साथ दिली आहे. या सगळयांच्या वर जायला पाहिजे होते. निवडणूका येतात निवडणूका जातात. आमदार येतील आणि आमदार जातील. सरकार येतात सरकार जातात, पण नाती केव्हा जपली जातील असा सवाल शेलार यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे याचा व्हिडीओ व्हायलर होत असल्याने भाजपाची साथ ही सरवणकर यांना नसून मनसेच्या अमित ठाकरेंना असल्याचे स्पष्ट होत आहे. (Mahim Assembly 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.