गोध्रा हत्याकांडावर आधारित ‘The Sabarmati Report’ चित्रपट; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

पीएम मोदींनी रिट्विट केलेली पोस्ट एका पत्रकाराची आहे. चित्रपटाबाबत असे म्हटले आहे की, हा चित्रपट जरूर पाहावा. हा चित्रपट आपल्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद घटनेचे सत्य समोर आणतो.

34

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी सकाळी जेव्हा अयोध्येहून परतणारे ५९ हिंदू यात्रेकरू आणि कारसेवक यांना घेऊन साबरमती एक्स्प्रेस गुजरात येथील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ आली. तेव्हा अचानक कारसेवक बसलेल्या डब्याचे बाहेरून दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर त्यावर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यात आला. त्यात सर्वचे सर्वजण जाळून खाक झाले. यानंतर मात्र गुजरातमध्ये प्रचंड मोठी जातीय दंगल उसळली.

गोध्रा हत्याकांडावर आधारित द साबरमती रिपोर्ट (The Sabarmati Report) या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबरला देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट केल्यानंतर अभिनेता विक्रांत मॅसीने आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी द साबरमती रिपोर्टवर (The Sabarmati Report) एका पत्रकाराच्या पोस्टला रिट्विट केले आणि त्यात लिहिले की, सत्य बाहेर येत आहे ही चांगली गोष्ट आहे, ती देखील अशा प्रकारे की सामान्य लोकांना देखील ते दिसेल. खोटी धारणा काही काळ टिकू शकतो, तथापि, तथ्ये समोर येतात.

साबरमती रिपोर्ट हा चित्रपट

पीएम मोदींनी रिट्विट केलेली पोस्ट एका पत्रकाराची आहे. चित्रपटाबाबत असे म्हटले आहे की, हा चित्रपट जरूर पाहावा. हा चित्रपट आपल्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद घटनेचे सत्य समोर आणतो.

पंतप्रधान मोदींनी ‘या’ चित्रपटांचेही केलेले कौतुक 

पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल 370’ या चित्रपटांचे कौतुक केले होते. १२ मार्च २०२२ रोजी काश्मीर फाइल्सच्या निर्मात्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. भेटीचे फोटो शेअर करताना चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी लिहिले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे कौतुक केल्यामुळे ही भेट अधिक खास ठरली. या चित्रपटाची निर्मिती करताना आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद मोदीजी.

त्याच वेळी, यावर्षी 22 फेब्रुवारीला जम्मूमध्ये एका रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी ऐकले आहे की या आठवड्यात ‘आर्टिकल 370’ वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे… ही चांगली गोष्ट आहे, कारण तो लोकांना योग्य माहिती देईल. (The Sabarmati Report)

agrawat
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.