शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज १२ वा स्मृतीदिन आहे. त्यामुळे सकाळपासून शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. या संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. एकीकडे महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील शिवसैनिक प्रचाराला ब्रेक देत शिवतीर्थावर अभिवादनासाठी उपस्थित राहिले.
( हेही वाचा : Assembly Election 2024 : मतदानासाठी पोलीस सज्ज; पिंपरी चिंचवडमध्ये साडेतीन हजार पोलीस तैनात)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना अभिवादन करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवतीर्थावर आले होते. तसेच माहिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार महेश सावंत ही यावेळी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजर होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाब्यातील द रिगल सिनेमा येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याला वंदन केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community