धारावीत हिंदू २५ टक्के तर मुस्लिम ७५ टक्के, ही परिस्थिती कुणामुळे? Maadhavi Latha यांचा मविआला सवाल

63
धारावीत हिंदू २५ टक्के तर मुस्लिम ७५ टक्के, ही परिस्थिती कुणामुळे? Maadhavi Latha यांचा मविआला सवाल
धारावीत हिंदू २५ टक्के तर मुस्लिम ७५ टक्के, ही परिस्थिती कुणामुळे? Maadhavi Latha यांचा मविआला सवाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची तयार सुरु आहे. त्यात भाजपा नेत्या माधवी लता (Maadhavi Latha) यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. धारावीतील शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे (Rajesh Khandare) यांच्या प्रचार रॅलीत त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी माधवी लता (Maadhavi Latha) म्हणाल्या की, तुम्ही (मविआतील) तेच हिंदू आहात ज्यांनी मुघल आणि इंग्रजांसोबत मिळून भारताला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रात आम्हाला कमळाला जिंकवावे लागेल कारण ज्यांनी श्रीरामाला आणले त्यांना निवडून आणणे गरजेचे आहे. त्यामुळे जरी ते चार वेळा जिंकले असले तरी आम्ही येत्या काळात कमळ फुलवणार. कारण ६५ वर्षांपासून भस्मासुरांचा हात ही जिंकत होता, परंतु आज देशात अखेर कमळ फुललेच, असेही माधवी लता (Maadhavi Latha) म्हणाल्या.

( हेही वाचा : PM Modi यांचे आव्हान राहुल गांधींनीही अर्धवट स्वीकारले; बाळासाहेबांना ‘Hinduhridaysamrat’ बोलण्याची हिंमत केली नाही

दरम्यान तेलंगणातील भाजप नेत्या माधवी लताही (Maadhavi Latha) महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाल्या आहेत. माधवी लता यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे ही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात धारावीत मुस्लिमांची संख्या कमी आणि हिंदूंची संख्या जास्त होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, असेही भाजप नेत्या माधवी लता (Maadhavi Latha) म्हणाल्या.

तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे नावाचा एक वाघ होता. मात्र त्यांच्या सुपूत्रांना बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार होता आले नाही. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात धारावीत २५ टक्के मुस्लिम आणि ७५ टक्के हिंदू होते, आता जाऊन बघा, परिस्थिती बदलली आहे. आज २५ टक्के हिंदू धारावीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील लोकांना तुम्ही जाऊन विचारा ही परिस्थिती का निर्माण झाली. तसेच महाविकास आघाडीसोबत जाणारे लोक हिंदू कसे असू शकतात?, असा सवाल उपस्थित करत माधवी लता (Maadhavi Latha) यांनी उद्धव ठाकरेंवर ही निशाणा साधला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.