बोरिवली विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत आहे. याठिकाणी भाजपाच्या (BJP) प्रचारात पक्ष संघटना आणि मित्र पक्ष यांच्या संघटित भावना निर्माण झाली असल्याने या ठिकाणचे वातावरण भाजपाच्या बाजूने झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या भागातून संजय उपाध्याय हे भाजपाचे पर्यायाने महायुतीचे उमेदवार आहेत.
ज्यावेळी संजय उपाध्याय यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा माजी खासदार गोपाळ शेट्टी नाराज झाले होते. मात्र पक्षाच्या नेत्यांनी लागेच त्यांची नाराजी दूर केल्याने या ठिकाणाचा संजय उपाध्याय यांच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आणि भाजपाचा (BJP) विजयाचा मार्ग सुकर झाला. लोकसभा निवडणुकीत या विधानसभेने भाजपाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तब्बल १,१३,००० मतांची आघाडी मिळवून दिली होती. ती आघाडी वाढवायची हे एकच आव्हान संजय उपाध्याय यांच्यापुढे आहे.
उपाध्याय यांनी गेली २४ वर्षे संघटनेत मोठ्या पदावर काम केले आहे. उच्च शिक्षण व मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी ही संजय उपाध्याय यांची जमेची बाजू आहे. मात्र दुसरीकडे उबाठाचे उमेदवार संजय भोसले यांना मात्र संघटनेचे पुरेसे पाठबळ नाही. बोरिवलीत ७ पैकी ५ नगरसेवक भाजपाचे (BJP) आहेत. नगरसेवकांची चांगली कामगिरी व प्रचारातील त्यांचा सहभाग संजय उपाध्यायांचा विजय मार्ग अधिक सुकर करतो. मराठी, गुजराथी व हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यामानाने महाविकास आघाडीचा प्रचार होताना दिसत नाही.
Join Our WhatsApp Community