Uddhav Thackerayच्या नेतृत्वात सरकार येणार म्हणत राऊतांनी ‘मविआ’त टाकली वादाची ठिणगी

83
Uddhav Thackerayच्या नेतृत्वात सरकार येणार म्हणत राऊतांनी ‘मविआ’त टाकली वादाची ठिणगी
Uddhav Thackerayच्या नेतृत्वात सरकार येणार म्हणत राऊतांनी ‘मविआ’त टाकली वादाची ठिणगी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन पुन्हा एकदा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. येत्या २० तारखेला मतदान करून २३ तारखेच्या निकालानंतर २६ नोव्हेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणा असे आवाहन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेनेने आपला मुख्यमंत्री ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणा म्हणत महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या प्रचारसभेत राऊत यांनी वादाची ठिणगी टाकली आहे. यावर शरद पवार गट आणि कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावे लागेल.

(हेही वाचा – मणिपूरचे मुख्यमंत्री N. Biren Singh यांच्या घरावर हल्ला)

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उबाठा शिवसेना महाविकास आघाडीचे प्रचार सभा बीकेसीत (BKC) पार पडली. या सभेत बोलताना उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे आवाहन केले. यावेळी भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टिका करत फडणवीस यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ही निवडणूक भावनिक करत चिन्ह पाहू नका, या निवडणुकीत महाराष्ट्र उभा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळणारे जे यश होते ते कमी होत असल्याने महाविकास आघाडीकडून आता याचा भावनिक मुद्दा बनवून महाराष्ट्राच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

(हेही वाचा – धारावीतील ITI चोरीला, माजी खासदार राहुल शेवाळेंचा आरोप)

आधीच महाविकास आघाडीमध्ये ज्याचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे ठरलेले असताना उबाठा शिवसेनेकडून निवडणूक निकालानंतर उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचा दावा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमीत कमी निवडून येतील यासाठी उबाठा शिवसेनेकडून प्रयत्न केला जात असून यामध्ये या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जास्तीत जास्त पाडण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनेकडून केला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.