मी काल एकनाथ शिंदे यांना ठाण्यात जाऊन आव्हान दिलं. आज तुमच्या साक्षीने आव्हान देतो. तू जर मर्दाची औलाद असलास, पण वाटत तर नाही… तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून मैदानात ये. मग तुला मतं तर मिळणार नाहीत, पण जोडे खावे लागतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.
(हेही वाचा – धारावीत हिंदू २५ टक्के तर मुस्लिम ७५ टक्के, ही परिस्थिती कुणामुळे? Maadhavi Latha यांचा मविआला सवाल)
विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election 2024) १८ नोव्हेंबर या दिवशी प्रचार संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वीच्या रविवारी असल्यामुळं सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला. राज्यात ठिकठिकाणी प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मुंबईच्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (MVA) जाहीर सभा पार पडली. या सभेत उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर (BJP) व्यक्तिगत पातळीवर उतरून टीका केली.
सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. आम्हाला वाटले, काय प्रेम आहे यांचे. आम्हाला भरून आले. पण त्यामागील त्यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. कारण राष्ट्रपुरुषांच्या यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव टाकल्यानंतर त्यांचा फोटो आणि नाव कुणीही वापरू शकते. त्यामुळेच लुटारू, मिंधे माझ्या वडिलांचे नाव वापरत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे नाव तुम्ही कपट कारस्थान करून वापरले. त्यासाठी दोन-तीन वर्षांआधीच नियोजन केले होते. फक्त शिवसेना फोडण्यासाठी हे कारस्थान केले गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community