बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी २३ नोव्हेंबर मतमोजणी होईल. तत्पूर्वी, महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत थंडावणार आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी सर्व शक्तीपणाला लावली आहे. दरम्यान, सोमवारी अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा सांगता सभा देखील होणार आहे. आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले. २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, तर ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, ५ नोव्हेंबर पासून प्रचारसभांना (campaign meeting) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या रंगत चालल्या आहेत.
(हेही वाचा – Assembly Election 2024: शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी)
यावेळी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी सभा घेत मतदारांना साद घातली. जवळपास महिन्याभरापासून हा सर्व प्रकार सुरू होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community