मुख्यमंत्रीपदाविषयी Supriya Sule यांनीही केले भाष्य; संगमनेरच्या सभेत म्हणाल्या…

81
मुख्यमंत्रीपदाविषयी Supriya Sule यांनीही केले भाष्य; संगमनेरच्या सभेत म्हणाल्या...
मुख्यमंत्रीपदाविषयी Supriya Sule यांनीही केले भाष्य; संगमनेरच्या सभेत म्हणाल्या...

आज मी प्रचाराच्या नव्हे, तर जल्लोषाच्या सभेसाठी आले आहे. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावं, अशी माझीदेखील इच्छा आहे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरच गरज आहे. मी आत्ताच बाळासाहेबांच्या कानात सांगितलं 2029 ला इथलं तिकीट आम्ही बदलणार आहे, असे म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. नुकतेच शरद पवार यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा केली आहे.

(हेही वाचा – Award Ceremony : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मानाच्या पुरस्काराने डॉ. मंजुषा कुलकर्णी सन्मानित)

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत सुप्रिया सुळे यांनी काल संगमनेरमध्ये जाहीर सभेला हजेरी लावली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे नेतृत्व देण्याचे वक्तव्य केले होते. त्या पाठोपाठ आज सुप्रिया सुळे यांनी देखील संगमनेर तालुक्यातील जनतेला संबोधित करताना तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं…अशी माझी देखील इच्छा, असं वक्तव्य केल्याने बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

या वेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते, तेव्हा आदर्श मोठा भाऊ कसा असावा हे समजतं. महाविकास आघाडी सरकार असताना देखील काहीही समस्या झाली, तर पवारसाहेब आधी बाळासाहेबांनाच फोन करत होते आणि त्यानंतर प्रश्न सुटतो. आता त्यांना मतदान का करावं तर ते सुसंस्कृत आहेतच, मात्र आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार हे नक्की तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण कर हे साईबाबा आणि माझ्या पांडुरंगाला देखील सांगेल.

मविआमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील यांचीही मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा लपून राहिलेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.