संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदर्भातील प्रचारसभांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात साधारणत: ३ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे. हमीभावापेक्षा जवळपास १ हजार १४१ रुपयांनी हे दर कमी आहेत. केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. काँग्रेसने आधी कर्नाटकात (Karnataka) सोयाबीनला (soybeans) सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान शेतकऱ्यांकडून दिले जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात सोयाबीनला दिल्या जाणाऱ्या दरावरून भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – Delhi air Pollution : हवा झाली विषारी, दिल्लीत अकरावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद)
जगात वर्षाला ३५ कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. यातील भारताचा वाटा साधारणत: एक कोटी टनपर्यंत आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ लाख हेक्टरवर तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मध्य प्रदेशात ५०.६० लाख टन तर महाराष्ट्रात ४०-४५ लाख टन उत्पादन अपेक्षित असते. मागील काही वर्षांत सोयाबीनने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. हे व्यापक क्षेत्र लक्षात घेऊन काँग्रेसने महायुतीवर टीका करण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी ठेवला आहे. महायुती सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनीही सोयाबीनची कास धरली. महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली. हे करताना त्यांना आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर पडला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवा कल्याण, गुलबर्गा बाजारात सोयाबीनला सुमारे ३ हजार ७५१रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. कलबुर्गीत हे दर आणखी खाली आल्याचीही माहिती आहे. आधी कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव काँग्रेसने देऊन दाखवावा, नंतरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशवासन द्यावे, असे आव्हान विदर्भातील शेतकऱ्यांनी दिले आहे. या फसव्या आश्वासनांवरून काँग्रेसचे (Congress) शेतकरीविरोधी धोरणा पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
आधी कर्नाटकात सात हजारांचा भाव द्या – खासदार डॉ. अनिल बोंडे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अमरावती जिल्ह्यातील तिवसाला आले. सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचे दर देऊ म्हणाले. एक शेतकरी या नात्याने देशातील सोयाबीनचे भाव पाहिले. संपूर्ण कर्नाटकात ३,८०० रुपयांपेक्षा सोयाबीनला भाव नाही. खर्गे यांच्या गुलबर्ग्याच्या बाजारात हे भाव दिले जात आहेत. तरीही कर्नाटक सरकार दखल घेत नाही, सोयाबीनची खरेदी करीत नाही. ‘भावांतर’ योजनाही राबवित नाही. खर्गे मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन खोटे बोलतात. लोकांची फसवणूक करतात. आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादकांना मदत दिली होती. आता भावांतर योजना लागू करून हमीभावापेक्षा कमी दरातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहेत. असे काही तरी कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना खर्गे यांनी सांगावे असा टोलाही डॉ. बोंडे (MP Anil Bonde) यांनी लगावला आहे. काँग्रेसमधील ८३ वर्षांचा माणूसही शेतकऱ्यांशी खोटे बोलू शकतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावध व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community