- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने मुख्य खेळपट्टीवर सराव केला तो एका सिम्युलेटर सामन्याच्या माध्यमातून. भारत व भारतीय अ संघातील फलंदाज विरुद्ध गोलंदाज असा हा तीन दिवसांचा सामना भारतीय संघ प्रशासनाने भरवला होता. खेळाडूंना सामन्यासारख्या वातावरणात सराव मिळावा या या सामन्यामागील हेतू होता. या सरावातून भारतीय संघाने ठरवलेलं उद्दिष्ट पुरेपूर साध्य केल्याचं संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी म्हटलं आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)
‘ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी गौतम गंभीर, रोहित आणि सहाय्यक प्रशिक्षकांचा चमू यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. या तीन दिवसांच्या सराव सामन्यातून काय साध्य झालं पाहिजे यावर आम्ही बोललो होतो. खेळाडूंना मुख्य खेळपट्टीवर कसून सराव करता यावा आणि इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी मिळावी असा हेतू या सरावामागे होता आणि तो उद्देश सफल झाला आहे,’ असं नायर मीडियाशी बोलताना म्हणाला. पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात फलंदाजांची कामगिरी चांगलीच सुधारली. याचाच अर्थ त्यांना परिस्थितीशी अधिक चांगलं जुळवून घेता आलं, असं नायर यांनी स्पष्ट केलं. (Border-Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा – हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवारांनी केले; शेवटच्या सभेत Raj Thackeray बरसले)
💬💬 On track for the 22nd 🙌
Assistant Coach @abhisheknayar1 & Bowling Coach @mornemorkel65 wrap up #TeamIndia‘s Match Simulation in Perth 👌👌
WATCH 🎥🔽 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 18, 2024
भारतीय गोलंदाजांसाठी हा सराव कसा होता याचाही आढावा अभिषेक नायर यांनी घेतला. ‘गोलंदाजांनी जास्त थकू नये यासाठी आम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण, एवढ्या मोठ्या दौऱ्यात गोलंदाजांना थकवा जाणवू शकतो. त्यामुळे आम्ही खासकरून तेज गोलंदाजांना दिवसाला १५ षटकंच टाकू दिली. पण, दुसऱ्याच दिवशी बुमरा आणि इतरही काही गोलंदाज प्रत्येकी १८ षटकं टाकायला लागले. त्यामुळे गोलंदाज सामन्यासाठी तयार आहेत हे नक्की,’ असं नायर यांनी बोलून दाखवलं. (Border-Gavaskar Trophy 2024)
गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनीही कसोटीसाठी संघ तयार असल्याचं म्हटलंय. ‘आणखी ३ सराव सत्र बाकी आहेत. २२ तारखेसाठी आमची तयारी पूर्ण आहे. आता पुढील दोन दिवस आम्ही रणनीती तयार करण्यावर भर देणार आहोत. २२ तारखेला खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी मैदानावर दाखवावी असाच आमचा प्रयत्न आहे,’ असं मॉर्केल यांनी म्हटलं आहे. २२ नोव्हेंबरला पर्थ इथं दौऱ्यातील पहिली कसोटी सुरू होणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community