उबाठाचे उमेदवार Mahesh Sawant यांची माहीम येथील अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला भेट; व्हिडिओ व्हायरल

97
उबाठाचे उमेदवार Mahesh Sawant यांची माहीम येथील अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला भेट; व्हिडिओ व्हायरल
उबाठाचे उमेदवार Mahesh Sawant यांची माहीम येथील अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला भेट; व्हिडिओ व्हायरल

दादर-माहीम (Mahim) विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. माहीममधून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे प्रथमच निवडणूक लढवत आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच उबाठा गटाकडून महेश सावंत हेही ही निवडणूक लढवत आहेत. जोरदार प्रचार करतांना तिन्ही उमेदवारांनी अनेक समाजघटकांची भेट घेतली. महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्या प्रचारातील एक व्हिडिओ मात्र चर्चेत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत Raj Thackeray यांनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं)

एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराने अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला भेट दिली आहे. रात्रीच्या वेळी अनेक मुसलमानांच्या घोळक्यात महेश सावंत हे माहीम समुद्रकिनारी पहाणी करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अनधिकृत बांधकाम म्हणून पाडलेल्या या दर्ग्याच्या पाहणीसाठी उबाठाचे उमेदवार गेल्याने त्याची मोठी चर्चा सुरु आहे.

काय आहे या अनधिकृत बांधकामाची पार्श्वभूमी ?

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २०२३ च्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईच्या माहीम परिसरातील समुद्रात अनधिकृत दर्ग्याचे काम चालू असल्याचे व्हिडिओद्वारे उघड केले होते. माहीम किल्ल्याच्या थोडे पुढे समुद्रात भराव टाकून दर्गा बांधण्याचे काम चालू होते. गूगल मॅपवरही या दर्ग्याचे नाव चिलह माहीम मगदूमशाह दर्गा असे नाव दाखवत होते. माहीम येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या मागे १०० मीटर अंतरावर हे बांधकाम चालू होते. रोजची किनाऱ्याची स्वच्छता मुंबई महापालिकेकडून होते. असे असूनही २ वर्षांपासून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाची कोणीही दखल घेतलेली नव्हती. याचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सरकारला १ महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन हे बांधकाम पाडले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.