वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) ही भारतातील सर्वात आलिशान रेल्वेगाड्यांपैकी एक आहे. यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खानपानाची सुविधाही पुरवली जाते. दरम्यान, तिरुनेलवेली ते चेन्नई (Tirunelveli to Chennai Vande Bharat Train) या मार्गावर एक किळसवाणी घटना समोर आली असून, संबंधित व्हिडिओमधील सांभारमध्ये काळे कीटक तरंगताना दिसले, ज्यामुळे अनेक वापरकर्ते प्रीमियम सेवेच्या अन्न गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहून नेटकरी रेल्वे केटररवर संताप व्यक्त करत आहेत. (Vande Bharat Train)
काँग्रेस खासदार मणिकम टागोर (Congress MP Manikam Tagore) यांनी व्हिडिओ शेअर करून भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर कारवाई करत रेल्वेने केटरिंग (Railway Catering) कंपनीवर तत्काळ कारवाई केली आहे.
रेल्वेने केटररला ठोठावला ५०,००० रुपयांचा दंड
रेल्वे प्रशासनाने याबाबत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे दिंडीहुल स्थानकावरील आरोग्य निरीक्षकांनी संबंधित अन्नाची तत्काळ तपास केला आला असता यामध्ये हा कीटक सांभाराच्या आत न राहता ॲल्युमिनियमच्या डब्याच्या झाकणाला चिकटला होता. त्यांच्या या निष्कर्षानुसार केटरिंग सर्व्हिस प्रोव्हायडरला रेल्वेने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
(हेही वाचा – पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत Raj Thackeray यांनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं)
“दूषित होण्याचे कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. या निष्काळजीपणासाठी वृंदावन फूड प्रोडक्ट्सच्या कंत्राटदाराकडून (Contractor Vrindavan Food Products) रु.५०,००० दंड आकारला असून, पुढील कारवाई सुरू आहे,” असे रेल्वेने सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community