मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष 

70

काँग्रेस आणि मुसलमानांची एक गठ्ठा मते, हे समीकरणच आहे. मागील ७०-७५ वर्षांपासून काँग्रेसचा हा इतिहास आहे, अल्पसंख्यांकांच्या नावाखाली मुसलमानांच्या एक गठ्ठा मतांच्या जोरावर सत्तेचे राजकारण करण्याची परंपरा काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक २०२४ मध्येही कायम ठेवली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने पुन्हा मुसलमानांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर मुसलमानांना आरक्षण (Muslim Reservation) देऊ, असे आश्वासन दिले आहे.

काय म्हणाले रेवंथ रेड्डी?

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, आमचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही विधानसभेत आरक्षणात मुस्लिम कोटा (Muslim Reservation) ठेवण्याबाबत चर्चा करणार आहोत. तेलंगणामध्ये आम्ही चार टक्के कोटा दिला आहे. महाराष्ट्रात याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ. आम्ही वाय.एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना सोनिया गांधींच्या नेतृत्वात ४ टक्के कोटा देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ११ हजार शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या तेव्हा ७२० मुस्लिम शिक्षकांना नोकरी मिळाली होती. न्याय आणि हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत यात शंकाच नाही. त्यामुळेच राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती, असे रेवंथ रेड्डी म्हणाले.

(हेही वाचा तिवसा मतदारसंघात ‘मविआ’त बिघाडी; शरद पवार गट ब्लॅकमेल करत असल्याचा Yashomati Thakur यांचा आरोप)

काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 

एका बाजूला भाजपाने काँग्रेस आणि मविआच्या वोट जिहादच्या विरोधात टीका करत ‘बटेंगे त काटंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशी टॅगलाईन तयार केली आहे. त्यावर भाजपा धर्मा धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत असताना काँग्रेसने मात्र मुसलमानांचे लांगुलचालन (Muslim Reservation) करणारी घोषणा करून ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी वृत्ती दाखवून दिली आहे

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.