- प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारावर उबाठा शिवसेनेने (UBT Shiv Sena) बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. प्रचारात सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाळला जात नसल्याबद्दल उबाठाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा देऊनही जिल्ह्यातील काँग्रेस आघाडी धर्म पाळत नसल्याचा आरोप उबाठाने केला आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांवर उबाठाकडून बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
(हेही वाचा – उबाठाचे उमेदवार Mahesh Sawant यांची माहीम येथील अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला भेट; व्हिडिओ व्हायरल)
आघाडीत संबंध ताणले गेले
काँग्रेसमध्ये आमच ठरलं आहे याच आविर्भावात असल्याचे दिसत आहे. विशेषतः अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना काँग्रेसकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेना उबाठाने (UBT Shiv Sena) केला आहे. उबाठा आणि काँग्रेसमधील संबंध ताणले आहेत. सोलापुरात महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेला आहे. उबाठाने काँग्रेससह ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचा निषेध केला आहे. सोलापुरमध्ये माकपचे उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर झालेली दगडफेक यातून आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले असताना उबाठाने (UBT Shiv Sena) जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. पक्षाचे सह संपर्कप्रमुख माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी ही घोषणा केली आहे.
(हेही वाचा – काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला ३,८००चा भाव; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल; MP Anil Bonde यांचे प्रतिपादन)
काँग्रेस बंडखोरांच्या प्रचारात
सोलापूर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपापासूनच मतभेदांना सुरुवात झाली. जागावाटप झाल्यानंतर या मतभेदाने वादाचे रूप धारण केले. बहुतांश मतदारसंघात अधिकृत उमेदवारांविरुद्ध आघाडीतीलच अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीनंतर हे पक्ष आघाडीचा प्रचार करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बंडखोराच्या प्रचारातच गुंतले आहेत. हा सर्व प्रकार वाढत गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडी धर्माची आठवण करून दिली आणि तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिला. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभेत कानउघडणीही केली परंतु हे सर्व झाल्यावरही सोलापुरात काँग्रेस पक्ष त्यांच्याच बंडखोराच्या प्रचारात सहभागी होत असल्यास आघाडी धर्माला तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा – मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )
त्यामुळे शिवसेना उबाठाकडून (UBT Shiv Sena) संताप व्यक्त होऊ लागला होता. याची परिणीती उबाठाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला. शेवटी ही जागा उबाठाच्या वाट्याला गेली असून तेथे या पक्षाचे अमर रविकांत पाटील हे उभे आहेत. मात्र काँग्रेसकडून अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष धर्मराज काडादी यांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांवर उबाठाने बहिष्कार घातला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community