- ऋजुता लुकतुके
सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. एकीकडे प्रसिद्धीसाठी त्याचा वापर होतो. तर दुसरीकडे नकारात्मक प्रसिद्धी आणि लोकांच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागू शकतं. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाही (Virat Kohli) अलीकडे चाहत्यांच्या रोषाचा असाच सामना करावा लागला आहे. खराब फॉर्मुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर कोहली विरुद्ध राग व्यक्त केला आहे. अशा चाहत्यांना सबुरीचा सल्ला देणारा एक विराट कोहलीचा व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) म्हणतो, ‘सगळी यंत्र वापरा. पण, ती सकारात्मक वापरा. सगळ्यांना सोशल मीडिया वापरता येतो. सोशल मीडियामुळे जगभरातील माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचते. पण, त्याचा वापर चांगल्या मनाने केला पाहिजे. ट्रोलिंग, नकारात्मकता आणि लोकांची टर उडवणे यासारखे प्रकार सोशल मीडियावर होता कामा नयेत.’
(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : ३ दिवसांच्या सराव सामन्यात काय काय घडलं?)
Targeting players, families, or kids isn’t cool—it’s just wrong.
If you’re a true Virat Kohli fan, follow his example: stay respectful and spread positivity. Let’s do better. pic.twitter.com/E283InIk3n
— Chase (@holopoem_3) November 15, 2024
विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडतोय. २०२४ च्या हंगामात ६ सामन्यांमध्ये विराटने २२.७२ च्या सरासरीने फक्त १०२ धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या त्याच्या कारकीर्दीत विराट कोहलीचा हा सगळ्यात खराब हंगाम आहे. ३६ वर्षीय कोहलीने अख्ख्या वर्षात एकमेव अर्धशतक ठोकलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात ७० धावा केल्या होत्या. तीच त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
कोहली आतापर्यंत पर्थमध्ये २ कसोटी सामने खेळला आहे. २०१२ मध्ये कोहलीने कसोटीच्या २ डावांमध्ये ४४ आणि ७५ धावा केल्या होत्या. ही कसोटी भारतीय संघाने १ डाव आणि ३७ धावांनी गमावली होती. पण, त्यानंतर २०१८ मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट (Virat Kohli) इथं दुसरी कसोटी खेळला. आणि ही कसोटी नवीन वाका मैदानावर होती. तेव्हा विराटने या मैदानावर पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं. विराटचं आंतरराष्ट्रीय कसोटीतील हे २५ वं शतक होतं. विराटकडून भारतीय संघाला या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका ४-० ने जिंकावी लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community