राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात

60

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपाला धारावी झोपडपट्टीची जागा अदानीला द्यायची आहे, असा आरोप करत एक है तो सेफ है, याचा अर्थ अदानी एक आहे आणि मोदी, शाह सेफ आहेत, अशी टीका केली.

या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या आरोपांवर खुलासा केला. त्यावेळी तावडे म्हणाले, धारावी पुनर्वसन या टेंडरमध्ये एक कंपनी अदानीची होती, एक कंपनी ही अबू धाबीमधली होती, त्यात ज्याला टेंडर मिळाले त्याला हे काम देण्यात येणार आहे. आता धारावीच्या जागेसाठी अबू धाबीच्या शेखची सुद्धा कंपनी होती, मात्र, त्यांना ते मिळाले नाही. मग आम्ही असे म्हणायचे का एक है तो सेफ है राहुल गांधीके मन मे शेख है, असे म्हणायचे का आम्ही? असा सवालही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )

राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गेले. एयर बसचा उल्लेख त्यांनी केला, त्यानंतर फॉक्सकॉन कंपनी कशी महाराष्ट्राबाहेर गेली हे त्यांनी सांगितले. मात्र महायुतीच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त आहे, 2022-23 आणि 2023-24 या वर्षात 1.18 लाख कोटी आणि 1.25 लाख कोटी, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 70 हजार 795 कोटींची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी 21 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आणि आता तिमाहीही 52 टक्के आली आहे. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करत असल्याचा आरोप विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केला आहे.

ज्यावेळी अदानीला तुमच्याच काळात एवढ्या गोष्टी दिल्या, 1990 मध्ये मुंदरा, 2005 मध्ये फूड कार्पोरेशनचे अॅग्रीमेंट तुम्ही केले मनमोहन सिंह यांच्या काळात, एमडीओचे काँट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिले, 2010 ला इंडोनेशिया आणि यांचे अॅग्रीमेंट तुम्ही करून दिले. हे वास्तव आहे. इथे येऊन गरीब धारावीकरांना घर मिळणार नाही असे सांगून कुठल्या तरी शेखला धारावीची जमीन द्यायची आहे का? असा सवाल विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.

मोदी यांनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणले

विनोद तावडे (Vinod Tawde)  म्हणाले, इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आणले. ही आकडेवारी महाविकास आघाडी मान्य करेल का? मोदी सरकारच्या काळातील इनफ्लेशन आणि युपीए काळातील इनफ्लेशनचा अभ्यास केला तर नेहमी युपीएचे हे जास्त राहिले आहे. जागतिक युद्ध सुरू असताना भारताने मोदींच्या नेतृत्वात इनफ्लेशन कसे रोखले हे सगळ्या जगाने मान्य केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.