Kho Kho Tournament : मुंबईतील मानाच्या महर्षी दयानंद आंतरमहाविद्यालयीन खो खो, कबड्डी स्पर्धेची घोषणा

Kho Kho Tournament : २ ते ५ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

39
Kho Kho Tournament : मुंबईतील मानाच्या महर्षी दयानंद आंतरमहाविद्यालयीन खो खो, कबड्डी स्पर्धेची घोषणा
  • ऋजुता लुकतुके

मुंबईत दरवर्षी दिवाळी हंगामात महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे आंतरमहाविद्यालयीन खो खो आणि कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. मुंबईतील विद्यार्थी घडवण्याचं आणि मोठ्या स्तरावर त्यांना व्यासपीठ देण्याचं काम ही स्पर्धा करत आली आहे. यंदाचं स्पर्धेचं ५० व वर्ष आहे. अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के यासारख्या खेळाडू या स्पर्धेनं राष्ट्रीय संघाला दिल्या आहेत. स्पर्धेची लोकप्रियता खेळाडूंमध्ये अफाट आहे. यंदा खो खो तसंच कबड्डी या देशी खेळांच्या स्पर्धा नियमितपणे होणार आहेत आणि २ ते ५ डिसेंबर अशी तारीख त्यासाठी नक्की करण्यात आली आहे. (Kho Kho Tournament)

(हेही वाचा – King George’s Medical University खाजगी की सरकारी?)

इच्छुक महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रवेशिका महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून घेणे आवश्यक आहे. त्या प्रवेशिकांवर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. प्रवेशिका दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत, सायं ५:०० वाजेपर्यंत मनोज पाटीलसर किंवा सौ. निकिता लाड (क्रीडा विभाग) यांच्याकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्पर्धेच्या आयोजनात कुठलेही अडथळे येणार नाहीत. (Kho Kho Tournament)

(हेही वाचा – सांगून ऐकत नसल्याने काँग्रेसच्या उमेदवारावर UBT Shiv Sena चा बहिष्कार)

नोंदणी अंतिम तारीख : २५ नोव्हेंबर २०२४, सायं ५:०० वाजेपर्यंत

स्पर्धा तारीख : २ ते ५ डिसेंबर २०२४

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.