Mike Tyson : ‘जेक पॉल विरुद्ध खेळताना मी जवळ जवळ मेलो होतो’ – माईक टायसन यांनी दिली पॉलच्या वर्चस्वाची कबुली

Mike Tyson : टायसन आणि पॉल यांच्यात अलीकडेच बॉक्सिंगची एक लढत पार पडली.

49
Mike Tyson : ‘जेक पॉल विरुद्ध खेळताना मी जवळ जवळ मेलो होतो’ - माईक टायसन यांनी दिली पॉलच्या वर्चस्वाची कबुली
  • ऋजुता लुकतुके

माजी हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन (Mike Tyson) आणि जेक पॉल यांच्यात अमेरिकेत शनिवारी एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती आणि या लढतीत पॉलकडून माईक टायसनला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर टायसन यांनी या लढतीतील पराभव प्रांजळपणे कबूल केलेला दिसत आहे. ५८ वर्षीय माईक टायसनने २७ वर्षीय युट्यूब स्टार जेक पॉलला आव्हान दिलं होतं. पण, बहुचर्चित या लढतीत टायसनचा पराभव झाला.

डॅलस काऊबॉय् ज संघाच्या एटीएँडटी मैदानावर बॉक्सिंग रिंगमध्ये ही लढत पार पडली आणि ७२,००० च्या वर प्रेक्षकांनी या सामन्याला हजेरी लावली होती. तर या सामन्याचं थेट प्रक्षेपण सादर करणाऱ्या नेटफ्लिक्स ओटीटी वाहिनीच्या म्हणण्यानुसार, ७० लाख लोकांनी ऑनलाईन हा सामना पाहिला. ‘तो एक असा सामना होता जिथे, मी हरूनही जिंकलो. त्या रात्रीसाठी मी लोकांचा आभारी आहे. शेवटचं बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याची संधी मला मिळाली,’ असं माईक टायसन (Mike Tyson) यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.

(हेही वाचा – राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात)

‘जूनमध्ये मी जवळ जवळ मेलो होतो. मला आठवेळा बाहेरून रक्त दिलं गेलं. शरीरातील निम्मं रक्त कमी झालं होतं. आणि वजन २५ पाऊंडांनी कमी झालं होतं. ही लढत खेळण्यासाठी आधी मला तंदुरुस्त व्हावं लागलं. आणि ते शक्य झालं म्हणूनच मी सगळ्यांचा आभारी आहे. माझ्या मुलांना मी वयाने निम्म्या असलेल्या मुष्टीयोद्ध्याबरोबर खेळताना मला दाखवायचं होतं. आणि ते शक्य झालं,’ असं टायसनने (Mike Tyson) म्हटलं आहे.

या सामन्यातील सर्व फेऱ्या जेक पॉलने जिंकल्या. टायसनपेक्षा चपळ हालचाली आणि जोरदार ठोसे यांच्या जोरावर त्याने बाजी मारली. पण, युवा पॉलने टायसनला नॉकआऊट पंच देऊ अशी घोषणा सामन्यापूर्वी केली होती, ते तो साध्य करू शकला नाही. टायसन (Mike Tyson) ५७ वर्षांचा आहे आणि त्यानुसार त्याच्या हालचालीही मंदावलेल्या दिसल्या.

(हेही वाचा – सांगून ऐकत नसल्याने काँग्रेसच्या उमेदवारावर UBT Shiv Sena चा बहिष्कार)

टायसनने सामन्यात पॉलला एकूण ९७ ठोसे लगावले. पण, यातील फक्त १८ त्याला गुण मिळवून देणारे ठरले. तेच पॉलने २७८ ठोसे लगावले आणि त्यातील ७८ योग्य ठिकाणी बसले. एकूण ८ फेऱ्यांची ही लढत होती. आणि ती संपता संपता जेक पॉलने एकदा टायसनसमोर (Mike Tyson) झुकून त्याला मानवंदना दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.