Veer Savarkar : ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

101

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, ‘मी सावरकर’ ही अभिनव वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विद्यार्थी, युवा आणि विचारशील भारतीयांसाठी देशभक्ती आणि विचारांचे  अभिव्यक्ती मंच आहे. या स्पर्धेत WhatsApp द्वारे विनामूल्य सहभाग घेता येईल.

स्पर्धा कोणकोणत्या प्रकारात होणार? 

  • वक्तृत्व (भाषण) – सावरकरांच्या विविध विषयांवर भाषण सादरीकरण.
  • काव्यनिर्मिती –  सावरकरांच्या कवितेचे विश्लेषण.
  • नाट्यवाचन – सावरकरांच्या नाटकांतील संवाद वाचन.
  • वादविवाद कौशल्य –  समान नागरी कायदा या विषयावर चर्चा.
  • संगीतमय सावरकर – सावरकरांच्या स्वरचित कवितांवर आधारित गीत सादरीकरण.

(हेही वाचा मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )

प्रत्येक श्रेणीतील प्रथम विजेत्याला १०,००० रुपयांचे पारितोषिक

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ आहे. ही स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषिकांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे संयोजक स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे असून सह संयोजक हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहेत  आणि विशेष साहाय्य हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांचे आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मोबाईल क्रमांक ८९५५६४२७३६ वर संपर्क साधावा. तसेच http://www.mesavarkar.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि देशभक्तीची अभिव्यक्ती साकारण्यासाठी अधिकाधिक जणांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Veer Savarkar)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.