ATP Masters Final : टैलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये हरवून यानिक सिनरचा एटीपी मास्टर्सवर कब्जा

ATP Masters Final : सिनरने फ्रिट्झला ६-४, ६-४ ने हरवलं.

24
ATP Masters Final : टैलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये हरवून यानिक सिनरचा एटीपी मास्टर्सवर कब्जा
  • ऋजुता लुकतुके

वर्षअखेरीस होणाऱ्या एटीपी मास्टर्स टेनिस अंतिम स्पर्धेत अखेर इटलीच्या यानिक सिनरने टेलर फ्रिट्झचा ६-४ आणि ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत बाजी मारली. अंतिम फेरीत सिनरचा हा पहिला विजय आहे. विशेष म्हणजे यंदाची अंतिम स्पर्धाही सिनरच्या मायदेशी इटलीच्या ट्युरिन या शहरात झाली. यंदाच्या वर्षी युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतही सिनरने फ्रिट्झला सरळ सेटमध्येच हरवलं होतं. तर अंतिम स्पर्धेच्या साखळी फेरीतही सिनरच जिंकला होता. (ATP Masters Final)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?)

या हंगामात यानिक सिनरने ८ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदांचाही समावेश आहे. त्यामुळे हंगामाच्या मध्यावरच तो जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. काही आठवड्यांपूर्वीच वर्षाच्या शेवटी तो अव्वल क्रमांकावरच राहणार हे स्पष्ट झालं होतं. (ATP Masters Final)

(हेही वाचा – Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल)

पहिल्या क्रमांकावर वर्ष संपवणारा तो पहिला इटालियन व्यावसायिक टेनिसपटू आहे. अंतिम फेरीतील विजय हा सिनरचा वर्षातील ७० वा विजय होता. त्याचवेळी एटीपी अंतिम स्पर्धा एकही सेट न गमावता जिंकणारा तो इव्हान लेंडलनंतरचा फक्त पहिला टेनिसपटू ठरला आहे. १९८६ मध्ये लेंडल यांनी ही कामगिरी केली होती. (ATP Masters Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.