- प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी झालेला गोळीबार, शाहरुख खानला आलेली धमकी तसेच बॉलिवूडच्या निकट असणारे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केली आहे. बिश्नोई टोळीच्या दहशतीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना तसेच त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात एकही बॉलिवूड सेलिब्रिटी आढळून आले नाही. बॉलिवूड सेलिब्रिटींची जागा यंदा मराठी मालिकेच्या अभिनेत्यांनी घेतल्याचे दिसून आले. (Assembly Election)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने ‘या’ शब्दांत केली सोशल मीडिया ट्रोलरना गप्प राहण्याची विनंती)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. राजकीय पक्षांच्या तसेच त्यांच्या उमेदवारांच्या प्रचार यात्रेत मतदारांना आकर्षित करणारे बॉलिवूड सेलिब्रिटींची कमतरता मतदारांना दिसून आली. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात प्रत्येक निवडणुकीत बॉलिवूड सेलिब्रिटींना खूप महत्त्व आलेले असते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्रचारासाठी बॉलिवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्री यांना आमंत्रित केले जाते. (Assembly Election)
(हेही वाचा – Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल)
मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण प्रचार यात्रेत तसेच सभांमध्ये एकही बॉलिवूड सेलिब्रिटी दिसून आले नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या भीतीमुळे रस्त्यावर दिसले नसल्याची चर्चा सर्वत्र होता. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानावर बिश्नोई टोळीकडून करण्यात आलेला गोळीबार, तसेच त्यांच्या पनवेल येथील बिश्नोई टोळीकडून करण्यात आलेली रेकी, शाहरुख खानला आलेली धमकी, तसेच बॉलिवूडच्या जवळ असणारे राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिश्नोई टोळीच्या भीतीमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनी गर्दीत न मिसळण्याचा निर्णय घेतला असून अनेक सेलिब्रिटींनी स्वतःची सुरक्षा वाढविण्यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज देखील केल्याचे समजते. बिश्नोई टोळीच्या भीतीमुळेच यंदाच्या निवडणुकीच्या प्रचार यात्रेत बॉलिवूड सेलिब्रिटी सामील झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. (Assembly Election)
(हेही वाचा – राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात)
दुधाची तहान ताकावर…
बॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात येणे टाळल्यामुळे मुंबई, ठाणे तसेच इतर शहरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारानी मराठी मालिकेतील सेलिब्रिटी प्रचारासाठी आणले होते. परंतु मराठी सेलिब्रिटींना मतदारांवर अधिक प्रभाव पाडता आला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु उमेदरवारांनी दुधाची तहान ताकावर भागवली अशीही चर्चा सुरू होती. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community