Shiv Sena Vs Shiv Sena UBT आणि Pawar Vs Pawar किती ठिकाणी आमने-सामने

68
Shiv Sena Vs Shiv Sena UBT आणि Pawar Vs Pawar किती ठिकाणी आमने-सामने
  • खास प्रतिनिधी 

गेल्या अडीच वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. कधी नव्हे इतके राजकीय पक्ष या विधानसभा निवडणुकीत पाहावयास मिळत आहेत. यात आता शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना उबाठा अशी लढत जवळपास ४९ मतदारसंघात होत असून अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांचा गट ३८ जागांवर आमने-सामने असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चारही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. (Shiv Sena Vs Shiv Sena UBT)

(हेही वाचा – मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही उबाठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या समोर त्यांचे गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे निवडणूक रिंगणात आहेत तर मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा सामना शिवसेना (शिंदे) गटाचे नेते, खासदार मिलिंद देवरा यांच्याशी होत आहे. माहीममध्ये मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित निवडणूक निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उबाठा गटाचे उमेदवार महेश सावंत हेही निवडणूक रिंगणात आहेत. (Shiv Sena Vs Shiv Sena UBT)

(हेही वाचा – राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात)

कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र

कोकण विभागात कुडाळमधील उबाठाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीला उभे आहेत. तर, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत हे रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघातून अनुक्रमे बाळ माने आणि राजन साळवी आमने-सामने आहेत. सावंतवाडीमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे दीपक केसरकर यांच्याविरोधात उबाठा गटाकडून राजन तेली निवडणूक रिंगणात आहेत. तर मराठवाडा भागात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, तानाजी सावंत व संतोष बांगर यांच्याविरोधातही उबाठा गटाचे उमेदवार उभे आहेत. तसेच विदर्भात मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात उबाठा गटाचे पवन जैस्वाल मैदानात आहेत. उत्तर महाराष्ट्रातही पाचोरा विधानसभा मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी लढत आहेत. मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Shiv Sena Vs Shiv Sena UBT)

(हेही वाचा – कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल)

राष्ट्रवादी ३८ जागांवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात ३८ ठिकाणी ‘पॉवरवॉर’ असल्याचे दिसून येत आहे. यात विदर्भात ५ ठिकाणी, मराठवाड्यात ६ मतदारसंघात, उत्तर महाराष्ट्रात ७ ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी, ठाण्यात २, कोकणात २ आणि पश्चिम महाराष्ट्रात १५ जागांवर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. (Shiv Sena Vs Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.