‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनच्या (Santiago Martin) विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने दि. १८ नोव्हेंबर सँटियागो मार्टिन आणि त्यांची कंपनी मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा.लि.शी संबंधित तब्बल २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत ईडीने तब्बल १२.४१ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली असून ६.४२ कोटी रुपयांची रक्कम एफडीआर गोठवण्यात आली आहे.(ED)
( हेही वाचा : Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त)
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाबसह २२ ठिकाणी ईडीने (ED) ही कारवाई केली आहे. पीएमएलए २००२ (Prevention of Money Laundering Act, 2002) च्या तरतुदीनुसार ईडीने (ED) ही कारवाई केल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच मार्टिन हे १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे असलेले राजकीय पक्षांना सर्वात मोठे देणगीदार होते. ईडी २०१९ पासून तामिळनाडूमध्ये या लॉटरी किंगची चौकशी करत होते. अखेर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. (ED)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community