- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत यंदा एकही संवेदनशील मतदान केंद्र नसून केवळ ७६ क्रिटीकल मतदान केंद्र असल्याची माहिती गगराणी यांनी दिली. या क्रिटीकल मतदानामध्ये शहरातील १३ आणि उपनगरांमधील ६३ मतदान केंद्राचा समावेश आहे. ज्या मतदान केंद्रात लोकसभेला १० टक्क्यांच्या खाली किंवा आसपास मतदान झाले आहे, त्या मतदान केंद्रातील मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु केंद्रीय निवडणूक अधिकारी यांच्या पाहणीमध्ये तसेच त्यांच्या निष्कर्षानुसार मुंबईतील मतदान केंद्र ही संवेदनशील नसून केवळ त्यामध्ये मतदानाचा टक्काचा कमी असल्याने या मतदान केंद्राचा समावेश क्रिटीकल केंद्रांमध्ये केला जात आहे. त्यानुसार मुंबईतील ७६ मतदान केंद्र ही क्रिटीकल केंद्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती गगराणी यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election)
विधानसभा निवडणुकीकरता येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून या मतदानासाठी मुंबईत कशाप्रकारे व्यवस्था तसेच तयारी करण्यात आली आहे याची माहिती जिल्हा निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अमित सैनी आणि अतिरिक्त निर्णय अधिकारी अभिजित बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – सांगून ऐकत नसल्याने काँग्रेसच्या उमेदवारावर UBT Shiv Sena चा बहिष्कार)
यंदा मुंबईत ३८ महिला संचालित मतदान केंद्र
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ८४ मॉडेल मतदान केंद्र बनवण्यात आली असून यामध्ये महिलांच्या माध्यमातून संचालित अर्थात सर्वच महिला कर्मचारी असतील अशाप्रकारे ३८ मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत. यात शहर भागातील १२ आणि उपनगर भागातील २६ मतदान केंद्राचा समावेश असेल.
मुंबई शहरांत दिव्यांग संचालित ०८ मतदान केंद्र
तर या मॉडेल मतदान केंद्राच्या संकल्पनेनुसार दिव्यांगांद्वारा संचालित केलेल्या ०८ मतदान केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रांमध्ये दिव्यांग कर्मचारी कार्यरत असेल आणि त्यांच्यामाध्यमातून केंद्रात मदत घेतली जाईल. अशाप्रकारे बनवण्यात आलेल्या दिव्यांग संचालित ०८ मतदान केंद्रांमध्ये शहरातील आठ मतदान केंद्राचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त)
तरुण कर्मचारी वर्ग संचालित ३८ मतदान केंद्र
या मॉडेल मतदान केंद्राच्या संकल्पनेत तरुण कर्मचारी वर्गाकडून संचालित ३८ मतदान केंद्राचा समावेश आहे. यामध्ये शहरातील १२ आणि उपनगरांतील २६ मतदान केंद्राचा समावेश आहे. यासर्व ३८ मतदान केंद्रांमध्ये तरुण कर्मचारी वर्गांचा भरणा आहे.
तब्बल १४, १७२ बॅलेट युनिट
येत्या २० नाव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रासह ईव्हीएम मशिनही उपलब्ध असून यामध्ये १४ हजार १७२ बॅलेट युनिट, १२,१२० कंट्रोल युनिट अणि १३, १३१ व्हीव्हीपीएटी असून यंदा व्हीव्हीपीएटी शंभर टक्के असल्याने कोणत्याही प्रकारची तक्रार मतदान केंद्रात नसेल. (Maharashtra Assembly Election)
मतदान केंद्रांवर सुमारे ४७ हजार कर्मचारी नियुक्त
विधानसभा मतदानासाठी महापालिकेचे सुमारे ६० हजार कर्मचारी आणि पोलिस व इतर कर्मचारी वर्ग पकडून सुमारे १ लाख कर्मचारी निवडणूक कामांसाठी कार्यरत आहे. यापैंकी मतदान केंद्रासाठी ४६ हजार ८१६ कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. यामध्ये शहर भागातील मतदान केंद्रासाठी ११ हजार ५८५ कर्मचारी आणि उपनगरांतील मतदान केंद्रासाठी ३५ हजार २३१ कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्रांवरील सुक्ष्म निरिक्षक म्हणून २ हजार २४२ अधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती गगराणी यांनी दिली आहे.
(हेही वाचा – ATP Masters Final : टैलर फ्रिट्झला सरळ सेटमध्ये हरवून यानिक सिनरचा एटीपी मास्टर्सवर कब्जा)
मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी सुमारे २५ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी एकूण २५ हजार ६९६ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. (Maharashtra Assembly Election)
मतदान केंद्र परिसरात मोबाईल बंदी
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल किंवा तत्सम साहित्य बाळगण्यास बंदी असून याबरोबरच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यासही बंदी असल्याचे जिल्हा निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – लॉटरी किंग मार्टिनशी संबंधित २२ ठिकाणी ED चे छापे; तब्बल १२ कोटींची रोकड जप्त)
मुंबईत सुमारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी
विधानसभा निवडणूक प्रचारसभेत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी विजिल ऍपवर प्राप्त झाल्या असून यामध्ये शहर भागातील ६२३ तर उपनगरांमध्ये ६१५ आचारसंहितेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात उपनगरातील ६१५ तक्रारींपैंकी ५६३ तक्रारींची दखल घेण्यात आली असून शहरातील ६२३ तक्रारींपैंकी ५६४ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. या आचारसंहिताभंग संदर्भात मुंबई शहरात ८ आणि उपनगरांमध्ये ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दखलपात्र व अदखल पात्र असे ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community