एअर इंडियाचे विमान (Air India) AI-2022 रविवारी (१७ नोव्हें.) रात्री 10 वाजता पॅरिसहून (Paris) दिल्लीसाठी (International flight Jaipur) रवाना झाले. विमान सोमवारी सकाळी 10.35 वाजता दिल्लीला पोहोचणार होते. पण, खराब हवामानामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही. हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेच्या सूचनेनुसार, वैमानिकाने रात्री 12:10 वाजता जयपूर विमानतळावर विमान उतरवले. वैमानिक हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेकडून उड्डाणासाठी मंजुरीची वाट पाहत राहिले. (Air India)
दुपारपर्यंतही मंजुरी मिळाली नव्हती, आणि ड्युटीची वेळ संपल्याचे कारण देत वैमानिकाने विमान सोडले. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत जयपूर विमानतळावर विमानातील १८० हून अधिक प्रवासी त्रस्त होते. (Air India)
उशीर झाल्याने प्रवाशांनी गोंधळ सुरू केला. प्रवासी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्याची मागणी करत होते. विमान कंपन्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. उलट त्यांना बसने दिल्लीला पाठवण्याचा पर्याय दिला. त्यांना जेवण दिले. नंतर काही प्रवासी एअरलाइन्सच्या बसने तर काही खासगी वाहनांनी दिल्लीला रवाना झाले. (Air India)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community