ठाकरेंचे मदतीचे आवाहन; Jayant Patil काय करणार ?

104
ठाकरेंचे मदतीचे आवाहन; Jayant Patil काय करणार ?
ठाकरेंचे मदतीचे आवाहन; Jayant Patil काय करणार ?

रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील मतभेदांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांना मदतीचं आवाहन केल्यामुळे आता जयंत पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल आणि उरणमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अशी लढत आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला अलिबागमध्ये मदत करतो, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी कर्जतमधील सभेत स्पष्ट केली. त्यामुळे काहीही झालं तर शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांना पराभूत करायचंच, असा चंग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बांधल्याचं स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा – Air India: ऐकावं ते नवल! ड्युटी संपली म्हणुन International flight Jaipur मध्ये सोडून पायलट गेले निघून)

कर्जतमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आवाहन करतानाच दोन गोष्टी थेट सुनावल्या. जयंतराव, तुम्ही असा विचित्र कारभार करू नका. अलिबागमध्ये मी माणूसकी दाखवली, तुमच्या कुटुंबीयांसाठी जागा सोडली. आपलं ठरलं होतं, उरणची जागा शिवसेना लढवणार. जर महाविकास आघाडी नीट झाली असली तर अलिबाग, पेण, पनवेल, तुम्ही लढवणार होता. मात्र, अलिबागची जागा मागे घेतल्यानंतर त्यांनी ना पेण, पनवेल, उरण, सांगोल्यातील उमेदवारी मागे घेतली. हे आघाडीचं काम नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एवढ्यावरच थांबले नाहीत तर लढायचं तर सरळ लढूया, दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया, असेही सभेतून जयंत पाटील यांना सुनावले.

(हेही वाचा – Dombivliतील उबाठा गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश)

जयंतराव तुम्ही कुणाच्या बाजूचे ?

दरम्यान, तुम्ही आम्हाला कर्जतमध्ये मदत करा,आम्ही तुम्हाला अलिबागमध्ये मदत करतो, असे आवाहन ठाकरे यांनी जयंत पाटील यांनी केले. असे केल्याने सगळे निवडूण येतील. आजचं संकट एका पक्षावर नाही महाराष्ट्रवर आहे. त्यामुळे एक एक आमदार महाराष्ट्र द्रोह्यांना रोखण्यासाठी उभा राहणार आहे. अशा वेळी जयंतरावांनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करायची की महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची, या शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बॉल थेट शेकापचे जयंत पाटील यांच्या कोर्टात टाकला आहे. रायगड जिल्ह्यात सध्या अलिबागमध्ये शेकाप विरुद्ध शिवसेना लढत आहे. तर पेण, पनवेल आणि उरणमध्ये महायुती विरुद्ध शेकाप आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार आहेत. त्यामुळे याचा फायदा थेट महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे भाजपला होणार आहे. त्यामुळे आता जयंत पाटील (Jayant Patil) उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.