विरारच्या (Virar) विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या कार्यकर्ता बैठकीत बविआच्या कार्यकर्त्यांनी येऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. या वेळी बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aaghadi) कार्यकर्त्यांनी तावडे यांना ३ तास घेराव घालून हॉटेलमध्ये गोंधळ घातला. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सील केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली.
(हेही वाचा – Anil Deshmukh यांनी राजकीय स्टंट केला, असे नेटकरी का म्हणाले?)
काय आहे प्रकरण ?
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे (BJP) राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली.
विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी बविआचे सर्व आरोप फेटाळले असून तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. निवडणुकीच्या मतदानाचे नियम काय असतात ते सांगत होते. मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community