Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद

85
Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद
Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद

विरारच्या (Virar) विवांता हॉटेलमध्ये भाजपचे (BJP) राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या कार्यकर्ता बैठकीत बविआच्या कार्यकर्त्यांनी येऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. या वेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना ३ तास घेराव घालून हॉटेलमध्ये गोंधळ घातला. यानंतर बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि नालासोपारा-विरार मतदारसंघाचे उमेदवार क्षितिज ठाकूर (Kshitij Thakur) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे आणि भाजपचे नालासोपारा-विरार मतदारसंघाचे उमेदवार हेही या पत्रकार परिषदेत त्यांची बाजू मांडणार होते.

(हेही वाचा – विरारमध्ये भाजपा-बविआमध्ये राडा; Vinod Tawde यांनी पैसे वाटल्याचा आरोप)

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजता राज्यातील प्रचार थांबला आहे. त्यामुळे आचारसंहितेचा दाखला देत निवडणूक आयोगाने ही संयुक्त पत्रकार परिषद थांबवली आहे. या पत्रकार परिषदेत विनोद तावडे म्हणाले की, हॉटेलचे सीसीटीव्ही चालू आहेत. मी कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो. तेव्हा बविआच्या कार्यकर्त्यांना येऊन आरोप सुरु केले. निवडणूक आयोगाने याविषयी निष्पक्ष कारवाई करावी.

पत्रकार परिषद आवरती घेतल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीतून रवाना झाले.

काय आहे प्रकरण ?

विरार (Virar) पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.