-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियातील एक ज्येष्ठ व अनुभवी क्रिकेट पंच टोनी दी नोब्रेगा (Tony De Nobrega) यांना फलंदाजाने मारलेला चेंडू डोळ्यावर बसल्यामुळे गंभीर इजा झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिसऱ्या श्रेणीतील हा सामना होता. उत्तर पर्थच्या चार्ल्स वरयार्ड रिझर्व्हस या मैदानावर हा सामना सुरू होता. फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका टोनी यांच्या उजव्या डोळ्यावर बसला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. (Umpire Hit With The Ball)
हा अपघात इतका भयंकर होता की, सोशल मीडियावरील त्याचा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे. पण, त्याचा एक ग्राफिकच्या आधाराने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर आहे.
(हेही वाचा – RCB Bowling Coach : मुंबईचा ओमकार साळवी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा नवीन गोलंदाजीचा प्रशिक्षक)
Umpire Tony DeNobrega suffered a blow to the face from a straight drive while officiating a third-grade WASTCA match—a stark reminder of how dangerous it can be on the field. Wishing Tony a speedy recovery! 🙏 #Perth #UmpiringNotEasy #CricketAustralia #CricketTwitter pic.twitter.com/TTx8jgk1fb
— lightningspeed (@lightningspeedk) November 18, 2024
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांची भाषा घसरली, त्यांना जेलमध्ये टाका; Ramdas Kadam यांची मागणी)
टोनी (Tony De Nobrega) यांचा ओठ, जबडा आणि डोळ्यालाही जबर मार बसलेला दिसत आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील क्रिकेट पंचांच्या असोसिएशनने या अपघातात लक्ष घालून टोनी यांच्या उपचारांची काळजी घेण्याचं ठरवलं आहे. या असोसिएशनच्या फेसबुक पेजवर टोनी यांना झालेल्या अपघाताचा तपशील देण्यात आला आहे. ‘फलंदाजाने मारलेला चेंडू थेट टोनी यांच्या डोळ्यावर आणि जबड्यावर बसला. नशीबाने टोनी यांच्या हाडाला कुठेही इजा झालेली नाही. सध्या ते रुग्णालयात देखरेखीखाली आहेत. पण, शस्त्रक्रिया करावी लागणार की नाही, हे डॉक्टर उपचारांचा प्रतिसाद बघून ठरवणार आहेत,’ असं या फेसबुक (Facebook) पेजवर म्हटलं आहे. (Umpire Hit With The Ball)
क्रिकेटच्या मैदानावर पंचांना आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये हा एक गंभीर अपघात मानला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community