निवडणुक कालावधीत दगडफेक झाली तर जबाबदारी पोलिसांची; Jitendra Awhad यांची धमकी

52
निवडणुक कालावधीत दगडफेक झाली तर जबाबदारी पोलिसांची; Jitendra Awhad यांची धमकी
निवडणुक कालावधीत दगडफेक झाली तर जबाबदारी पोलिसांची; Jitendra Awhad यांची धमकी

“निवडणुक कालावधीत दगडफेक झाल्या तर ही संपुर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल. आतापर्यंत १० दिवसात कुठेही निवडणुक प्रक्रियेचे, कायद्याचे उल्लघंन आम्ही केलेले नाही. निवडणुकीपूर्वी ४८ तास आधी बाहेरील नेत्याने मतदारसंघात येऊ नये, असा निवडणुक आयोगाचा नियम आहे. मात्र कळवा- मुंब्रामध्ये बाहेरचे लोकचं जास्त आहेत. कोणी भांडुप, विक्रोळी कन्नमवार नगर मधले सगळे भाईलोक, गॅगस्टर मुंब्रात असतात. ठाण्याच्या लोकांचे कळवा- मुंब्र्यात काय काम आहे?”, असा सवाल ही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विचारला. (Jitendra Awhad)

( हेही वाचा : Virar मध्ये भाजप-बविआमध्ये राडा; निवडणूक आयोगाने थांबवली पत्रकार परिषद

पोलिस प्रशासन ही कठोर राहत नाही. कायदा सांगतो की, बाहेरच्या लोकांना मतदारसंघात येता कामा नये, असे आव्हाड म्हणाले. दरम्यान विरारमध्ये बविआ (Bahujan Vikas Aaghadi) कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पैसे वाटल्याचा आरोप करत घेराव घातला. जवळजवळ तीन तास विनोद तावडे यांना बविआ कार्यकर्त्यांनी घेतले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) राज्यात दगडफेक होईल, असे विधान केल्याने एकच खळबळ माजली आहे.

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.